नवी दिल्ली।काँग्रेस (Congress) नेतृत्वासमोर पुढील लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या (strategy) ब्ल्यू प्रिंटमध्ये काँग्रेसची मीडिया रणनीती बदलणे, संघटना मजबूत करणे आणि ज्या राज्यांमध्ये काँग्रेस भाजपची सत्ता आहे त्या राज्यांवर विशेष लक्ष देण्यावर भर देण्यात आला आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार (election strategist Prashant Kishor) प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या योजनेवर अंतिम निर्णय काँग्रेस (Congress High Command) हायकमांड घेईल, असे काँग्रेसच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे तसेच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये यावे , असे मतही काँग्रेस पक्षातून व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसची रणनीती अंमलात येणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र काँग्रेसच्या ‘हायकमांड’ कडून कोणता फैसला होतो यावरच काँग्रेसची पुढची वाटचाल अवलंबून राहणार आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 16 एप्रिल रोजी सोनिया गांधी (Congress president Sonia Gandhi) आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर दोघांची भेट पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रशांत किशोर आणि सोनिया गांधी यांची आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. प्रशांत कुमार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीमुळे राजकीय पेच निर्माण होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती काँग्रेससमोर मांडली आहे. विशेष म्हणजे त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम न करण्याची देखील घोषणा केली आहे. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये त्यांची भूमिका काय असेल यावरील साशंकता कायम आहे.निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर (पीके) यांनी संयुक्त राष्ट्रांमध्येही काम केले आहे. किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 16 एप्रिल रोजी वरिष्ठ नेत्यांसमोर पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. पीके यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Prashant Kishor has presented the strategy for the 2024 Lok Sabha elections to the Congress) रणनीतीची ब्लू प्रिंट काँग्रेससमोर मांडली. त्यांनी मांडलेल्या योजनेवर विचार करण्यासाठी पक्ष नेत्यांचा एक गट तयारी करेल, जो एका आठवड्यात आपला अहवाल सोनिया गांधींना सादर करेल. किशोर यांच्या निवडणुकीची रणनीती आणि त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याबाबत काँग्रेस नेतृत्व लवकरच निर्णय घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.