Prashant Kishor, who was an election strategist for various political parties including BJP, then Congress and then JDU, will no longer be strategizing for others. Due to a tweet, such a discussion is going on in the political circles and as he hinted on Twitter that Prashant Kishor will now take his own side, what is the next strategy of Prashant Kishor?

Prashant Kishor’s strategy: … तर काँग्रेसला नवसंजीवनी! 

नवी दिल्ली ।एकेकाळी बलाढ्य असणारा  काँग्रेस पक्ष (Congress party)  सद्यस्थितीत अस्तित्व टिकविण्याबरोबरच वर्चस्व कसे मिळवता येईल यासाठी  धडपडत आहे. त्यात अंतर्गत मतभेदांनीही  काँग्रेस पक्षाला ग्रासले आहे. असे असले तरी आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर (upcoming 2024 Lok Sabha elections)  काँग्रेसला सुगीचे दिवस येऊ शकतात.  असा   ठाम दावा प्रसिद्ध निवडणूक रणनितीकर प्रशांत किशोर (Prashant Kishor’s strategy) यांनी केला आहे.प्रशांत किशोर यांनी २०२४ साठी काँग्रेसने १७ राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय पक्ष संघटनात्मक काही बदल करणे अनिवार्य असल्याचे सुचविले आहे. त्यात महत्वाची बाब अशी कि,  काँग्रेसचा अध्यक्ष जर बिगर गांधी परिवारातला असेल तर खूप मोठा फरक पडू शकतो,याकडे  प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसचे लक्ष वेधले आहे. आता काँग्रेसची कोणती भूमिका राहील हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.   

काँग्रेसला (CONGRESS PARTY ) सादर केलेल्या ‘रोडमॅप’मध्ये अशा आशयाचा दावा केल्याचे वृत्त एका इंग्रजी माध्यमाने दिले आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला जे सादरीकरण केले आहे. त्यात १९८४ व २०१९ या दोन निवडणुकांची तुलना केली आहे. सादरीकरणात त्यांनी म्हटले आहे कि,   १९८४ ला ५४३ पैकी ४१४ जागा मिळाला होत्या. काँग्रेसची  सर्वात उत्कृष्ट कामगिरी  १९८४ ला होती. इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. राजीव गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा होती. त्यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवण्यात आली, त्यावेळी काँग्रेसने ५४३ पैकी ४१४ जागा जिंकल्या होत्या याची आठवण प्रशांत किशोर यांनी करून दिली.तर  २०१९ च्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी केलेल्या मांडणीत   तुरळक ठिकाणी काँग्रेस राहिल्याकडे लक्ष वेधले आहे. केरळ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू या राज्यांमध्ये सत्ता उरली. जी पडझड इतक्या वर्षात झाली ,हे त्यांनी मांडले आहे. १९७१ ते ७७ या काळात २४ पैकी १५ राज्यांमध्ये काँग्रेस होती.
 
२०२४साठी काय करावे?
 लोकसभा निवडणूक २०२४ साठी प्रशांत किशोर यांनी महत्वपूर्ण सल्ले  दिले आहेत. त्यानुसार १७ राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपची  ( BJP) थेट लढत आहे.  तिथे काँग्रेस स्वबळावर लढावे असे नमूद केले आहे शिवाय काँग्रेसने कुणासोबतही युती करू नये असा सल्ला दिला आहे. मात्र   स्वबळावर काँग्रेसवर लढली तर जिंकण्याची शक्यता खूप कमी आहे;पण त्याचा परिणाम भविष्यात काँग्रेससाठी चांगला होईल. एकप्रकारे काँग्रेसचे पुनरुज्जीवन होईल  असेही  त्यांनी म्हटले  आहे.
मोदींविरोधात ( NARENDRA MODI) जी विरोधकांची तिसरी आघाडी आहे. त्यांना  सोबत घेतले  म्हणजे युपीए  ३ (UPA 3 agenda) हा अजेंडा समोर ठेवून काँग्रेस गेले  तर जिंकण्याची शक्यता ही मध्यम प्रमाणात राहील . काँग्रेस मित्रपक्षांसोबत गेली तर तेदेखील शक्य आहे. त्यावेळीही जिंकण्याची शक्यता कमी प्रमाणात आहे असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले  आहे. हा फॉर्म्युला असा आहे की बऱ्याच ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाच्या आणि काही ठिकाणी मित्र पक्षांना घेऊन लढावे.  परिणामी मोदींना हरवण्याची शक्यता वाढते असा फार्मुला प्रशांत किशोर यांनी दिला  आहे.
  पाच राज्यात लहान भावाच्या भूमिकेत जावे 
पाच राज्यांमध्ये काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करावी असेही  प्रशांत किशोर यांनी म्हटले  आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल (Maharashtra, Tamil Nadu, Andhra Pradesh, Bihar and West Bengal) या राज्यांमध्ये काँग्रेसने दुय्यम भूमिका घ्यावी. तिथल्या पक्षांना महत्त्व देऊन काँग्रेसने लहान भावाच्या भूमिकेत जावे  असेही  प्रशांत किशोर यांनी सुचवले  आहे.
 
महाराष्ट्रात राष्ट्रवादी मोठा… मात्र शिवसेनेला गृहीत धरले नाही
झारखंड मुक्ती मोर्चा, डीएमके, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसने गेले पाहिजे असे ‘पी. के. ‘ यांनी सुचवले आहे. त्यात  महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष असला पाहिजे असेही  प्रशांत किशोर (  पी. के.) यांनी म्हटले  आहे. महाराष्ट्रात शक्य असलेले युतीचे पर्याय म्हणून प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला (SHIV SENA )  मात्र  गृहित धरलेले  नाही.  १७ राज्ये  अशी आहेत.  जिथे काँग्रेस इतर पक्षांसोबत जाऊन राज्ये  आणावीत  असे सुचवले  आहे. 
 
पक्ष संघटनात्मक ‘ हे’ बदल सुचवले 
काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्याने काँग्रेसचे  नेतृत्व करावे. त्यात  काँग्रेसचे  अध्यक्षपद हे सोनिया गांधींकडे असावे.   असा पर्याय प्रशांत किशोर यांनी दिला आहे. हंगामी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष बिगर गांधी चेहरा असावा  .तर संसदीय बोर्डाचे  नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे असावे आणि महासचिव म्हणून प्रियंका गांधींनी काम करावे. असेही  प्रशांत किशोर यांनी सुचवले  आहे.त्यातही काँग्रेसचा अध्यक्ष जर बिगर गांधी परिवारातला असेल तर खूप मोठा फरक पडू शकतो हा महत्वाचा बदल   प्रशांत किशोर यांनी  सुचविला आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *