Prashant Kishor, who was an election strategist for various political parties including BJP, then Congress and then JDU, will no longer be strategizing for others. Due to a tweet, such a discussion is going on in the political circles and as he hinted on Twitter that Prashant Kishor will now take his own side, what is the next strategy of Prashant Kishor?

Prashant Kishor: प्रशांत किशोर काढणार राजकीय पक्ष!

नवी दिल्ली। भाजप (BJP), नंतर काँग्रेस  (CONGRESS) आणि नंतर जेडीयूसह  ( JDU)विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor)आता इतरांसाठी रणनीती बनवणार नाहीत. एका ट्विटमुळे अशी चर्चा  राजकीय वर्तुळात रंगत असून प्रशांत किशोर आता त्यांचा  स्वत: पक्ष काढतील (Political party to form Prashant Kishor) तसे संकेत  त्यांनी   ट्विटरवरुन दिले आहेत. त्यामुळे  प्रशांत किशोर यांची आगामी रणनीती काय ?(strategy of Prashant Kishor)आणि ती कुणाला तोट्याची ठरणार यावर आता राजकीय वर्तुळात  तर्क -वितर्क सुरु झाले आहेत. 

काँग्रेसमधील (CONGRESS) चर्चा निष्फळ ठरल्यानंतर प्रशांत किशोर यांनी  केले आहे. त्यात म्हटले आहे की, “लोकशाहीत प्रभावी योगदान देण्याची आणि लोकांप्रती कृती धोरणे तयार करण्यात मदत करण्याची त्यांची भूक खूप चढ-उतार झाली आहे. आता लोकांमध्ये जाण्याची वेळ आली आहे. म्हणजेच, लोकांमध्ये जेणेकरुन त्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊन ‘जन सुरज’च्या मार्गावर वाटचाल करता येईल असेही  ते म्हणाले आहेत.  तसेच, त्याची सुरुवात बिहारपासून (start from Bihar) होईल हेही त्यांनी नमूद केले आहे.
पार्टी… आधुनिक, डिजिटल! 
 प्रशांत किशोर हे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर राजकारणात मोठा बदल घडवण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांची पार्टी पूर्णपणे आधुनिक, डिजिटल असेल आणि जनसंपर्क करण्याच्या नवीन प्रगत तंत्रज्ञानासह लॉन्च केली जाईल. (Political party to form Prashant Kishor)पक्षाचे नाव काय असेल याबद्दल कोणतीही अंतिम चर्चा नाही. मात्र   एक-दोन वर्षांत त्यांचा राजकीय पक्ष सुरू करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *