पुणे। पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने (Vanchit Bahujan Aghadi) आयोजित सत्ता परिवर्तन महासभेत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी मराठा समाजातील नेते जरांगे पाटील (Jarange Patil ) यांना थेट निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला आहे.
आंबेडकर म्हणाले ‘आम्ही आण्णा पाटील यांचे आंदोलन बघितले आहे. आण्णा पाटील यांचे आंदोलन जिरवण्यात आले. आता मराठा आरक्षणाचा लढा देण्यासाठी राज्यात उभं राहिलेलं आंदोलन जिरवायचं नसेल, तर जरांगे पाटील यांना निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही.
सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. जर तुम्ही निवडणुकीत उभे राहिले नाही, तर येथील निजामी मराठे तुम्हाला कधी संपवतील हे तुम्हाला देखील कळणार नाही. येथल्या गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहिल्या नाहीत. कारण ते उभे राहू दिले नाहीत. त्यामुळं उपेक्षितांच्या चळवळीत एकजूट होणं गरजेचं आहे.’ शिवाय आपल्याला ४८ पैकी ४८ जागा जिंकायच्या असतील तर वंचित मुस्लिम हा भेद मिटवावा लागणार आहे. मगच आपण ४८ पैकी४८ जागा जिंकू, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
…तरच मुस्लिम समाजाला सुरक्षितता
जरांगे पाटील यांना नवीन मित्र शोधावा लागणार आहे. नवीन मित्र हा येथील मुसलमानांशिवाय दुसरा कोणीही नाही. आज मुस्लिम समाज देखील स्वतःची सुरक्षा वेगवेगळ्या राजकीय पक्षात शोधत आहे. मी आज मुस्लिम समाजाला सांगतो की, राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाही. आज मुस्लिमांना अलिप्तपणातून मुक्त व्हावे लागणार आहे. तो ज्या दिवशी बाहेर पडेल आणि येथील वंचितांच्या बरोबर फिरेल, तेव्हा समूह त्यांना सुरक्षितता दिल्या शिवाय राहणार नाही.
Prakash Ambedkar: Jarange Patil has no option but to contest elections directly