PMC Election 2022 Ward structure announced; New wards, new strategies

PMC Election 2022  प्रभाग रचना जाहीर; नवे प्रभाग, नवी व्यूहरचना!

पुणे| पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी (PMC Election 2022) राजकीय हस्तक्षेपामुळे गाजलेली प्रभागरचना अखेर जाहीर झाली असली तरी आता हरकती सूचनांचा ‘पाऊस’ पडणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रभागांची झालेली मोडतोड,त्यात समाविष्ट गावांमुळे बदललेले  समीकरण कोणत्या राजकीय पक्षांच्या  पथ्यावर पडते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर विद्यमानांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले  आहे. विशेष करून भाजपच्या बहुतांश विद्यमानांना आता नवी व्यूहरचना आखावी लागणार आहे. परिणामी  अनेकांना दुसरा प्रभाग शोधावा की  पक्षांतर करावे या पेचाला सामोरे जावे लागणार आहे. 

पुणे महापालिका निवडणुकीसाठी (PMC Election 2022) प्रारूप    प्रभागरचना जाहीर झाली आहे.त्यात ५८ प्रभाग(58wards) असून  प्रभागांचे नकाशे प्रसिद्ध झाले आहेत.   ५७ प्रभागांतून तीन नगरसेवक तर एका प्रभागातून दोन असे एकूण १७३ नगरसेवक नागरिकांना  निवडून द्यायचे आहेत. एकूण सदस्य संख्या असलेल्या १७३ जागांमध्ये २३ अनुसूचित जाती, २अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण गटासाठी १४८ अशा जागा असल्या तरी त्यात  महिलांसाठी ८७ जागांचा अंतर्भाव असून अनुसूचित जातीसाठी १२  व अनुसूचित जमातीसाठी १ आणि सर्वसाधारण गटासाठी ७४ अशी प्रभाग रचना आहे.

हरकती -सूचनांसाठी जाहीर झालेल्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेबाबत  भाजपने शंभरपेक्षा जास्त जागा मिळतील असा ठाम विश्वास व्यक्त केला असला तरी राष्ट्रवादीकडून स्वबळाचा ‘गजर’   करण्यात आल्याने भाजपला पक्षांतर आणि इच्छुकांच्या मांदियाळीची नाराजी या मुद्द्याला  सामोरे जावे लागणार आहे. शिवसेनेला पूर्वीची ताकद हस्तगत करण्याची आयती संधी लाभली असली तरी,काही तगडे  उमेदवार ‘आयात ‘ करावे लागणार आहेत. काँग्रेसच्या पूर्वाश्रमीच्या माननीयांना सुसंधी लाभली असली तरी स्वबळावर काँग्रेसचा कितीपत निभाव लागतो हा प्रश्न भेडसावणार आहे. यंदाही  ‘मिनी विधानसभा’च्या धर्तीवर होणाऱ्या   पालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत  आणि अस्तित्वातील चार सदस्यीय प्रभागांची झालेली मोडतोड त्यात समाविष्ट गावांमुळे तसेच संभाव्य आरक्षण, महिला आरक्षण आणि जातींनुसार मतांचे समीकरण कसे दृढ होईल यानुसार नव्या प्रभागरचनेत अनेक भाग  निम्म्याहून अधिक प्रभागात समाविष्ट झाल्याने  अनेक विद्यमानांना  त्याचा मोठा फटका बसणार आहे. शिवाय मतविभाजनाची टांगती तलवारही राहणार आहे. परिणामी सोयीचे प्रभाग शोधायचे की पक्षांतर करायचे या कात्रीत अनेक विद्यमान अडकले आहेत. त्यामुळे आता हरकती सूचनांचा पाऊस पडणार  आहे. 

 

मतांचे विभाजन पथ्यावर … 

राष्ट्रवादीकडून सत्ताधारी भाजपवर विकासकामांवरून सातत्याने  टीकेची तोफ डागली जात आहे. इतकेच नाहीतर भाजपच्या गोटातील अनेकांना गळालाही लावले आहे. त्यात पक्षांतर्गत असंतोष उफाळून येत असल्याने तसेच समाविष्ट ३४ गावांमुळे सत्तेची समीकरणे बदलत असल्याने भाजपच्या वर्तुळात त्यावर मंथन सुरु झाले  आहे.त्यात इच्छुकांची वाढती संख्या पाहता, उमेदवारी वाटपात असंतोषाचा भडका उडणार हे चित्र आतापासूनच दिसत असल्याने भाजपच्या नेतृत्त्वाने आता सावध पवित्रा घेतला आहे.त्यानुसार विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला जात असून, जिथे पक्षाचे प्राबल्य आहे. तिथे लक्ष केंद्रीत  करायचे. जिथे ताकद नाही,तिथे छुप्यारीतीने अन्य पक्ष,किंवा मनसेच्या उमेदवारांना  चालवायचे यावर प्राथमिकरीत्या शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. तसेच यंदा उमेदवारी वाटपात नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची  मात्र ते किती टक्के यावरही विचारविनिमय सुरु झाला आहे. त्यामागे भाजपमधील नाराजांना दिलासा कसा देता येईल,यासह राष्ट्र्वादी – शिवसेनेतील  नाराजांचा उपयोग कसा आणि कुठल्या मतदारसंघात करून घेता येईल यानुसार  व्यूहरचना आखण्यास प्रारंभ झाला आहे. सत्तेचा मार्ग सुकर करणाऱ्या मतदारसंघावरच  लक्ष केंद्रीत  करताना, जिथे प्राबल्य नाही त्या त्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी, शिवसेनेतील नाराजांना भाजप प्रवेश देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे. वेळप्रसंगी मनसे अथवा अन्य पक्षांच्या उमेदवारांना चालवून मतांचे विभाजन पथ्यावर पाडून  घेण्याची रणनीती भाजपची  असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे

जशास तसे… 

गत विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजपने गमावलेले आहेत.त्यामुळे या दोन मतदारसंघात फुटीची मात्रा वापरली तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नेस्तनाबूत करता येणे सहजशक्य आहे. त्यात या दोन मतदारसंघात यंदा   नगरसेवकांची ६३  संख्या असणार आहे. हे पाहता  उमेदवारीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही इच्छुकांची रस्सीखेच होणार हे अटळ आहे आणि  नाराजी मोठ्या प्रमाणावर  उफाळणार आहे. त्याचा अचूकतेने फायदा उचलला तर या मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व प्राप्त करता येऊ शकते.   प्रामुख्याने हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर आणि वडगावशेरी या विधानसभा मतदारसंघात  मतविभाजनाचा डाव खेळून सेनेसह राष्ट्रवादीला गारद करण्याकडे भाजपचे प्राधान्य राहील. याठिकाणी होंणाऱ्या मतविभाजनामुळे   त्रिशंकू स्थिती  निर्माण होण्यास हातभार लागेल असा अंदाज भाजपमधील काही मंडळींचा आहे. 

  प्रभागांचे क्रमांक,  नावे,आरक्षण व मतदार संख्या

1. धानोरी – विश्रांतवाडी =STand SC

मतदार=55488

2. टिंगरेनगर – संजय पार्क

मतदार= 56969

3. लोहगाव – विमान नगर=SC

मतदार=61836

4. वाघोली – इऑन आयटी पार्क=SC

मतदार =58912

5. खराडी – चंदननगर

मतदार=67367

6. वडगावशेरी

मतदार=60110

7. कल्याणीनगर – नागपूर चाळ=SC

मतदार=67739

8. कळस – फुलेनगर=SC

मतदार=62273

9. येरवडा=SC

मतदार =71390

10. शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी=SC

मतदार =62481

11. बोपोडी – पुणे विद्यापीठ=SC

मतदार=57861

12. औंध – बालेवाडी=SC

मतदार=62050

13. बाणेर – सुस म्हाळुंगे

मतदार =37589(2चाप्रभाग)

14. पाषाण – बावधन बुद्रुक=ST

मतदार=58515

15. पंचवटी – गोखलेनगर

मतदार=67821

16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे

मतदार =67103

17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर

मतदार=67951

18. शनिवार वाडा – कसबा पेठ

मतदार =67701

19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल=SC

मतदार=58994

20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड=SC

मतदार=67129

21. मुंढवा – घोरपडी=SC

मतदार=67574

22. मांजरी – शेवाळवाडी=SC

मतदार=61878

23. साडेसतरानळी – आकाशवाणी

मतदार=55659

24. मगरपट्टा – साधना विद्यालय

मतदार= 56446

25. हडपसर गावठाण – सातववाडी

मतदार=55782

26. भीमनगर – रामटेकडी=SC

मतदार=67721

27. कासेवाडी – हरकानगर=SC

मतदार=68501

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट

मतदार= 57483

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई

मतदार= 67592

30. जयभवानी नगर – केळेवाडी

मतदार=60237

31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर

मतदार=61115

32. भुसारी कॉलनी – सुतारदरा

मतदार=67127

33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी

मतदार=66216

34. वारजे – कोंढवे धावडे

मतदार=64919

35. रामनगर – उत्तमनगर शिवणे

मतदार=67422

36. कर्वेनगर

मतदार=67260

37. जनता वसाहत – दत्तवाडी

=SCमतदार=67332

38. शिवदर्शन – पद्मावतीSC

मतदार=66561

39. मार्केटयार्ड – महर्षी नगर=SC

मतदार=59580

40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क=SC

मतदार=59882

41. कोंढवा खुर्द – मिठानगर

मतदार=55825

42. सय्यदनगर – लुल्लानगर

मतदार=54026

43. वानवडी – कौसरबाग

मतदार=59414

44. काळेपडळ – ससाणेनगर

मतदार=55287

45. फुरसुंगी

मतदार=55957

46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची=SC

मतदार=55047

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी

मतदार=55662

48. अप्पर सुपर इंदिरानगर=SC

मतदार=56884

49. बालाजीनगर – के के मार्केट

मतदार=58027

50. सहकारनगर – तळजाई=SC

मतदार=62398

51. वडगाव – पाचगाव पर्वती

मतदार=67289

52. नांदेडसिटी – सनसिटी

मतदार=66626

53. खडकवासला -नऱ्हे

मतदार=63525

54. धायरी – आंबेगाव

मतदार=58447

55. धनकवडी – आंबेगाव पठार

मतदार=57719

56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ

मतदार=56327

57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर

मतदार=55971

58. कात्रज – गोकुळनगर

मतदार=57847

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *