Prakash Ambedkar's criticism of Fadnavis: 'That' clip should have been made public

OBC Reservation:भाजपही दोषी!

नांदेड ।सरकारने ओबीसीच्या   राजकीय आरक्षणाचं खोबरं करायचं ठरवलंय असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा  प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टात मांडला. यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. याला भाजप देखील दोषी आहे. इम्पेरीकल डेटा सहज मिळाला असताना मात्र तो केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला नाही.( Prakash Ambedkar on OBC Reservation)अशी टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

राज्यातले  सरकार हे बहुजन जनतेचे  नसून श्रीमंत मराठ्यांचे आहे, अशी टीकाही  प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर केली आहे. श्रीमंत मराठ्यांना कोणालाही आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून मागासवर्गीय आयोगाचा कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टात तो मांडला गेला. शेवटी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. ओबीसी आरक्षणाला   (OBC Reservation)श्रीमंत मराठ्यांनी घालवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

… अजेंडा आरएसएसचा

ओबीसींवर मुस्लिमांनी अन्याय केला नसून उच्च वर्णीय हिंदू लोकांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांना कधीही निकाली काढायचा नाही. तर त्यांना देशातून पूर्ण आरक्षण बंद करायचं आहे असा अजेंडा आरएसएसचा (RSS) आहे. त्यामुळे जोपर्यंत यांना सत्तेवरून हटवत नाही, तोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार असेही आंबेडकर म्हणाले.

भाजप- राष्ट्रवादी सोडून… 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (BJP -NCP) सोडून कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयारी आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. कॉंग्रेसने समाधानकारक जागा दिल्या तर आम्ही कॉंग्रेस किंवा शिवसेनेसोबत (CONGRESS -SHIVSENA) निवडणुका लढवू असेही आंबेडकर म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *