नागपूर |
आमदार नितेश राणे कुठे अज्ञातवासात गेलेले नसून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. आणि आम्हाला अज्ञातवासात जायची गरज नाही असे स्पष्ट करताना गरज पडली तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि अशा पद्धतीने सूडाच्या भावनेतून कारवाई होईल तर न्यायालयात जावेच लागेल अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मांडली आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांना कणकवलीत नुकतीच मारहाण झाली. या मारहाण प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचे नाव घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना चौकशीसाठी हजर राहावे यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शनिवार (दि. १८ डिसेंबर)रोजी परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते.या पार्श्वभूमीवर राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सध्या सर्व सुडाच्या भावनेतून राजकारणातून अश्या बातम्या पेरल्या जात आहे.आमदार नितेश राणे कुठे अज्ञातवासात गेलेले नसून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. आणि आम्हाला अज्ञातवासात जायची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले.