JDU leader Nitish Kumar has taken oath as the Chief Minister of Bihar for the eighth time. Governor Fagu Chauhana administered oath of office and secrecy to him. Along with him, RJD leader Tejashwi Yadav also took oath as Deputy Chief Minister. Tejashwi Yadav has become the Deputy Chief Minister of Bihar for the second time. After taking the oath, Chief Minister Nitish Kumar has targeted the Prime Minister Narendra Modi by saying that he won in 2014, but now we have to worry about 2024.

Nitish Kumar targets PM:’2014 मध्ये जिंकलात, 2024 ची काळजी…’

पाटणा ।जेडीयूचे नेते नितीश कुमार (JDU leader Nitish Kumar) यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहाना यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. त्यांच्यासोबत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव   दुसऱ्यांदा    बिहारचे (Bihar) उपमुख्यमंत्री बनले आहेत. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर  (Nitish Kumar targets PM )निशाणा साधताना मात्र ‘२०१४ मध्ये जिंकलात,पण आता २०२४ (2024 Lok Sabha election) ची काळजी करायला हवी’ असे वक्तव्य करून मोदी विरोधकांना साद घातली आहे. 

 मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांवर निशाणा साधताना  विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले  आहे. नितीश कुमार म्हणाले की, पंतप्रधान मोदी 2014 मध्ये जिंकले. पण  आता त्यांनी 2024 ची काळजी करायला हवी. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे. मी 2024 साली पंतप्रधानपदाचा दावेदार नाही. नवीन सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, असा टोला नितीश कुमारांनी विरोधकांना लगावला आहे.
आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री
मागील 22 वर्षांत नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. 2000 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. तेव्हा अवघे सात दिवस ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते.  दरम्यान, भाजपने जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात, असल्याचा आरोप करत नितीश कुमारांनी भाजपसोबतची युती तोडली. मंगळवारी आमदार आणि खासदार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. बैठक झाल्यावर नितीश कुमार यांनी आपला राजीनामा दिला. आज अखेर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.Nitish Kumar targets PM: ‘Winned in 2014, worry about 2024…’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *