Nitin Gadkari ... then he will leave politics

Nitin Gadkari … तर राजकारण सोडून देईल!

नागपूर। राजकारण हा पैसा कमविण्याचा धंदा नाही. आजवर मी ५० लाख करोड रुपयांचे विकासकामे( I have done development work worth Rs 50 lakh crore)केली आहेत. मात्र एक जरी ठेकेदार येऊन कमिशन खाल्ले असे म्हणाला तर राजकारण सोडून देईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.नागपूरमधील अटलबिहारी वाजपेयी ई- लायब्ररीच्या (Atal Bihari Vajpayee E-Library) उदघाटनप्रसंगी नितीन गडकरी यांनी नागपूर  महानगरपालिकेच्या

पदाधिकाऱ्यांनाही  अप्रत्यक्षरित्या टोलाही  लगावला.यावेळी नितीन गडकरी म्हणाले, देशभरात 50 लाख करोड रुपयांचे रस्त्याचे जाळे विणण्याचे काम केले. नागपुरात 86 हजार करोड रुपयांचे काम केले,मात्र  एकाही ठेकेदाराकडून कमीशन घेतले नाही. एक जरी ठेकेदार येऊन कमिशन खाल्ले म्हणाला तर राजकारण सोडून देईल.

यावेळी त्यांनी लायब्ररीच्या झालेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले. पैसे कमावणे चुकीचे नाही. मात्र, राजनीती हा पैसे कामावण्याचा धंदा ही नाही.(Politics is not about making money) पैसे कमवायचे असतील तर मला सांगा पेट्रोल [पंप मिळवून देण्यासाठी मदत करेल. व्यवसायात मदत करेल;पण राजकारणात पैसे कमविण्याचा धंदा करू नका.असेही ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *