ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. या पार्श्वभूमीवर राज्याचे वातावरण तापलेले असताना भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचे (it is suspected that Sharad Pawar is Dawood’s man in Nawab Malik’s case.) वक्तव्य केले.त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून आमदार नितेश राणे यांच्याकडूनही अशा प्रकारची वक्तव्य केली गेल्याने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
गुन्हा नोंद झाल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जे बोलायचे ते पोलिसात बोलणार आहे. हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा शंभरवेळा करेल. मी दंगल कुठे भडकवली. हिंदु म्हणुन भूमिका मांडली. राज्य सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही. एवढाच त्यांना दाऊदचा पुळका असेल, तर त्यांनी महात्मा गांधींच्या फोटोंऐवजी दाऊदचे फोटो भिंतीवर लावावे. देशविघातक कृत्य करणाऱ्या दाऊदबद्दलच मी बोललो कुणाच्या विरोधात बोललो नाही, असेही नितेश राणे म्हणाले.