मुंबई ।वरळीत कोणीही भाजपला (BJP) आव्हान देण्याची हिमंत करु नये. पेंग्विन पार्कमध्ये कसे पाठवायचे हे आम्हाला माहिती आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर साधा मी म्यांव म्यांव आवाज काढल्यावर काय अवस्था झाली, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहीले आहे. त्यामुळे उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कोणी करु नये. मुंबई काही कोणत्या साहेबांची नाही. मुंबई असंख्य मुंबईकरांची आहे, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंना (Shiv Sena leader Aditya Thackeray)डिवचले आहे.
दहीहंडी उत्सवानिमित्त राणे वरळी येथे आले होते. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात येऊन थेट त्यांच्यावर नितेश राणेंनी निशाणा साधला. दहीहंडी उत्सवात राजकीय नेते एकमेकांवर टोलेबाजी करायची संधी सोडत नाहीत,हेच यानिमित्ताने दिसून आले.
राणे कुटुंबीय नेहमीच ठाकरे परिवारावर थेट निशाणा साधतात. अनेकवेळा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर राणे कुटुंबीय उघड उघड टीका करतात. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणापासून नितेश राणे हे आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत असताना आदित्य ठाकरे जात होते, त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी म्यांव, म्यांव म्हणत त्यांना चिडवण्याचा प्रयत्न केला होता.(Nitesh Rane: No one in Worli should dare to challenge BJP)