पुणे ।एकीकडे उर्फी जावेद (Urfi Javed)हिच्यावर बोलायला पक्षातील नेत्यांना वेळ आहे;पण मी भाजपचीच (BJP) पदाधिकारी असूनही माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, मदत करण्यासाठी पक्षातील लोकांना वेळ नाही. श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी मला खोटे आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले व माझ्यावर अन्याय केला असा आरोप भाजपच्या (BJP) निर्मला यादव (Nirmala Yadav) यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena deputy leader Sushma Andhare) , राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील (Nationalist Congress leader Rupali Patil) यांच्यासोबत भाजपच्या निर्मला यादव यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अजूनही पक्षाने माझी हाक ऐकावी आणि मला न्याय द्यावा असे आवाहनही केले. यावेळी पक्षातीलच श्रीकांत देशमुख यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले.
निर्मला यादव म्हणाल्या, मी इथे स्वेच्छेने आली आहे. माझ्या पक्षातच माझे ऐकले जात नाही. मी सतत चार ते पाच महिने पक्षाची इज्जत वाचवत होते.मात्र आज कोर्टात माझे वकीलही त्रस्त झाले. संविधानाचा गैरवापर होत आहे. त्यामुळेच मी पुण्यात आले. सुषमा अंधारे यांच्याशी ओळख काढली. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत घेत आहे.
निर्मला यादव म्हणाल्या, मी पोलिस एफआयआर केला. मी लेखी तक्रारीचा पाठपुरावा करीत आहेत. श्रीकांत देशमुख यांनी मला खोटी आमिषे देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मलाही त्यांच्याबाबत काही प्रश्न होते परंतु ते माझा विश्वास संपादन करीत होते. त्यांनी मला इमोशनल केले, आमिष दाखवला. मी नातेवाईक असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवत गेली.
निर्मला यादव म्हणाल्या, माझी नार्को टेस्ट करावी. महिला म्हणून मी पक्षाकडे मदत मागायला गेले. सांगलीत एका नेत्याकडे गेली. तेव्हा मला धक्कादायक अनुभव आला. माझ्यावरच आरोप करण्यात आले होते. याचाही मला मनस्ताप झाला. श्रीकांत देशमुख यांनी मला मी जशी आहे तशी पसंद आहे, असे सांगितले. सर्व रेकाॅर्डींग्ज माझ्याकडे आहेत. सर्व घटनांचा मनावर परिणाम होत आहे. माझा पक्ष उर्फीवर बोलतो परंतु, स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्तीचे ऐकले जात नाही. चंद्रकात पाटील यांना एवढेच बोलायचे आहे की, माझा आवाज आज तरी ऐका, माझ्यावर झालेला अन्याय न्यायप्रविष्ठ आहे. माझ्यावर अन्याय झाला पण श्रीकांत देशमुखांना उसंत मिळत आहे. माझा पक्ष ऐकत नाही म्हणून सुषमा अंधारे यांच्याकडे आले. त्यांनी माझी पोस्ट शेअर केली त्यामुळे मी त्यांना भेटले.
कैफीयत गृहमंत्र्यांनी ऐकायला हवी
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, निर्मला यांचे श्रीकांत देशमुख यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले; पण आता हे नाते नाकारले जात आहे. निर्मला या भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षाच्या पत्नीच नाही तर मुंबई प्रदेश युवती जनरल सेक्रेटरी आहेत. भाजपकडे निर्मला यांनी मदत मागितली. पक्षांतर्गत गोष्ट म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याकडे मदत मागितली. केवळ पक्षीयच नव्हे तर कौटुंबिक पातळीवरही मदत मागितली पण मदत मिळाली नाही. कपड्यावरुन भाजपच्या महिला नेत्या टीका करीत आहेत. पण निर्मला यांना त्रास दिला जात आहे. काल परवा प्रकाश महाजन यांचे मानसिक संतुलन ढासळले, त्यांच्यावर मी बोलणार नाही परंतु एकूण सर्वच महिलांकडे बघण्याचा चष्मा या लोकांचा काय आहे तो लक्षात यायला हव्या. निर्मला यांची कैफीयत गृहमंत्र्यांनी ऐकायला हवी. निर्मला यांनी 376 ची केस दाखल केली परंतु, त्यांना न्याय मिळत नाही.(Nirmala Yadav: Time for BJP to talk about Urfi Javed, but…)