In protest against the use of the victim for political gain, the Nationalist Youth Congress (NYC) staged a 'Jodo Maro' agitation against the image of BJP leader Chitra Wagh. Shiv Sena leader Raghunath Kuchik was accused by a young woman in Pune of sexual abuse and abortion. In it, BJP leader and vice-president Chitra Wagh jumped in and was constantly presenting her position on the issue. However, in Goa, it was Chitra Wagh who kept me under wraps. The role played by the victim created a stir in the political circles.

NCP:भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

पुणे ।  पीडित तरुणीचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याच्या निषेधार्थ   राष्ट्रवादी युवती काँग्रेसने (NCP)  भाजप नेत्या ( BJP leader Chitra Wagh )  चित्रा वाघ यांच्या  प्रतिमेला ‘जोडो मारो’ आंदोलन करून निषेध नोंदवला. 

शिवसेना नेते (Shiv Sena leader Raghunath Kuchik)  रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार आणि गर्भपात केल्याचा आरोप केला होता.गेल्या  दोन महिन्यापासून राजकीय वातावरण तापले होते. त्यामध्ये भाजपच्या नेत्या व  उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उडी घेत   या प्रकरणावर त्या सतत भूमिका मांडत होत्या. मात्र मला गोव्यात चित्रा वाघ यांनीच डांबून ठेवले होते, अशी भूमिका पीडित तरुणीने मांडल्याने  राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.त्या पार्श्वभूमीवर पीडित तरुणीचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याच्या निषेधार्थ   बालगंधर्व रंगमंदिर चौकात   राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून  चित्रा वाघ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुषमा सातपुते म्हणाल्या की, चित्रा वाघ यांना पक्षात कोणत्याही प्रकारच स्थान नसल्याने,अशा प्रकारे एका युवतीच्या भावनेचा वापर केला गेला आहे. ही निषेधार्ह बाब असून स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी एखाद्या युवतीचा फायदा घेऊ नये.तसेच चित्रा वाघ या मानसिकरित्या आजारी असल्याने त्यांना मनोरुग्णालयात पाठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चित्रा वाघ यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.तर कारवाई न झाल्यास वेळ प्रसंगी त्यांच्या तोंडाला काळे फासून,रस्त्यावरून धिंड काढू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *