central government has increased petrol and diesel prices for the last three days. Also, domestic gas cylinder rates have been increased. Against this, the Nationalist Congress Party (NCP) became aggressive and staged an agitation near the statue of the Queen of Jhansi.

NCP :इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन 

पुणे |केंद्र सरकारने गेल्या 3 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ केली आहे. तसेच, घरगुती गॅस सिलेंडर दरातही  वाढ करण्यात आली आहे. या विरोधात(NCP’s against fuel price hike)  राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक होत झाशीच्या राणी पुतळ्याजवळ चूल मांडत आंदोलन केले. 

देशात 5 राज्यांच्या निवडणुका होत्या.  तेव्हा जीवनावश्यक वस्तूंचे दर हे नियंत्रणात ठेवण्यात आले होते. पण जसे निवडणुका संपल्या तसे मोदी सरकारच्यावतीने पेट्रोल डिझेल तसेच घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आलेले आहेत. जेव्हापासून देशात मोदी सरकार आले आहे. तेव्हापासून सातत्याने पेट्रोल-डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किमतीत वाढ होताना दिसून येत आहे.एकेकाळी साडेतीनशे रुपयाला मिळणारा गॅस आज हजार रुपयाच्या किमतीत मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या सरकारने लवकरात लवकर घरगुती गॅस तसेच पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने (NCP) करण्यात आली.    
निवडणुका आल्या की ,दर स्थिर ठेवायचे.  निवडणुका पार पडल्या कि,  पुन्हा सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकायचा, हीच खरी भाजपची नीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. इथून पुढच्या काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास पराभूत करत महागाई विरोधातला हा राग आपण व्यक्त करावा असे आवाहन शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी या आंदोलन प्रसंगी केले. 
या आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह प्रवक्ते  प्रदीप देशमुख, संदीप बालवडकर, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी नगरसेवक उदय महाले,संतोष फरांदे,  काकासाहेब चव्हाण, संतोष नांगरे, गणेश नलावडे, शहर समन्वयक महेश हांडे,दीपक कामठे,  दिलशान आतार, अनिता पवार, शिल्पा भोसले,प्रीती धोत्रे, अमृता थोरात, सानिया झुंजारराव  यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *