Eknath Shinde is Chief Minister in name only. While there is continuous criticism from the opposition party that Devendra Fadnavis is in charge of the state as the Deputy Chief Minister, now the NCP has tweeted a photo of Eknath Shinde's son MP Shrikant Shinde sitting on the Chief Minister's chair. Even after this, no explanation has been received from the Eknath Shinde group or the Chief Minister's office.

NCP tweet Shrikant Shinde Photo​:​श्रीकांत शिंदे सुपर सीएम ​झालेत का ?​

मुंबई ।एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे केवळ नावापुरते मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राज्याची जबाबदारी सांभाळतात अशी  टीका सातत्याने विरोधी पक्षाकडून होत असताना आता एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र  खासदार श्रीकांत शिंदे हेच  मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो ट्विट करत राष्ट्रवादीने (NCP tweet Shrikant Shinde Photo) आता खासदार श्रीकांत शिंदे  हेच सुपर सीएम असल्याचा नवीन आरोप केला आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा आशयाचे ट्विट केल्यानंतर अद्याप तरी एकनाथ शिंदे गट किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतचे स्पष्टीकरण आलेले  नाही. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा कारभार त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे चालवतात का? असा प्रश्न उपस्थित करणारा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत वर्पे यांनी ट्विट  केला आहे. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा असे ट्विट करताना सोबत फोटोही जोडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. असा कसा धर्मवीर? असा सवाल रविकांत वर्पे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.  या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे खुर्चीवर बसले आहेत. खुर्चीच्या मागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा शासकीय फलक दिसतोय. या फोटोच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत वर्पे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री, राज्य सरकारला हा सवाल विचारला आहे.(NCP tweet Shrikant Shinde Photo: Has Shrikant Shinde become Super CM?) 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *