A video shared by Mumbai Police Commissioner Sanjay Pandey on Twitter has exposed the brass of MP Navneet Rana, who has made serious allegations against the police. Navneet Rana, who alleged that the police did not provide water as he was a backward class man, was found drinking tea with her husband MLA Ravi Rana at the police station. "We don't need to say anything more than that," said Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in a captioned video shared on Twitter. Therefore, the attention of the political circles is now focused on the new role of Leader of the Opposition Devendra Fadnavis.

Navneet Rana: ‘त्या’ व्हिडीओमुळे नवनीत राणांच्या आरोपातील हवाच निघून गेली!

मुंबई। मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे  (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey)यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा  (Navneet Rana)यांचे पितळ उघडं पडलं आहे. मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी पाणी दिले नाही,असा आरोप करणाऱ्या नवनीत राणा मात्र पती आमदार रवी राणासमवेत (tea with her husband MLA Ravi Rana at the police station) पोलीस स्टेशनमध्ये चहा पिताना व्हिडिओमध्ये आढळून आल्याने राणा पती पत्नी आता गोत्यात आले आहेत. त्यात   “यापेक्षा आम्हाला अधिक काही सांगायची गरज नाही”, असं कॅप्शन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरवर (Twitter) शेअर केलेल्या व्हिडीओला दिल्याने नवनीत राणा यांच्या आरोपातील हवाच निघून गेली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोणती भूमिका नव्याने मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर २३ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली. यावेळी त्यांना आपल्याला पिण्यासाठी पाणी दिले  नाही की  वॉशरुमला जाऊ दिले. तसेच आपण मागासवर्गीय असल्याने  पोलीस कर्मचाऱ्याने  आपल्याला पाणी देण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप राणा यांनी खार पोलिसांवर केला होता.नवनीत राणा यांनी काल हा आरोप केला होता त्यानंतर एक दिवसाने   मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजची एक क्लीप ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी दिलेला चहा पिताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघंही स्वतःच्या हाताने साखर घेऊन चहा घेताना या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडिओच ‘सर्व काही सांगत असल्याचे’  सूचकपणे संजय पांडे यांनी म्हटले  आहे

वस्तुस्थिती काय हेच व्हिडीओतून स्पष्ट

दरम्यान, नवनीत राणा यांनी या प्रकरणी लोकप्रतिनिधी असल्याने  हक्कभंगाचा मुद्दा उपस्थित करत थेट लोकसभा अध्यक्षांना ई-मेल करत तक्रार केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत लोकसभेच्या हक्कभंग समितीनं नवनीत राणांच्या कथीत बेकायदा अटकेवर महाराष्ट्र सरकारला २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश काल दिले होते.मात्र आता वस्तुस्थिती काय हेच व्हिडीओतून स्पष्ट झाले आहे आणि नवनीत राणा यांचे पितळ उघडं पडलं आहे. त्यामुळे आता दिल्लीतून कोणती भूमिका घेतली जाते हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. यापूर्वीही राणा यांनी पोलिसांवर हक्कभंगचा आरोप केला होता. अमरावतीतील दंगलीसंदर्भात त्यांनी पोलिसांविरोधात तक्रार केली होती. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *