मुंबई ।मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे (MNS party president Raj Thackeray)यांना स्वतः चे ध्येयधोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीत यश मिळत नाही. त्या नैराश्यातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (chief spokesperson Mahesh Tapase) यांनी दिले आहे.
मुस्लिम मते दूर जातील, या भीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही जाहीर भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. केवळ शाहु-फुले-आंबेडकरांचेच नाव घेतात, असा जुनाच आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा केला. त्यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी थेट ‘बातमी’ चा संदर्भ दिला. ते म्हणाले, निवडणुका आल्या की शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही, हे समीकरण राज ठाकरे यांना कळाले आहे. त्यामुळेच ते आता शरद पवारांवर टीका करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शरद पवार घेत नाहीत, या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना तपासे म्हणाले, हे राज ठाकरेंचे अतिशय चुकीचे वक्तव्य आहे. लोकांची दिशाभूल करणारे आहे. पवारांचे व्यक्तिमत्व काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.(Nationalist Congress’s reply: Sharad Pawar’s comment on Raj Thackeray’s despair)