Nagpur. After dedicating the Samridhi Highway, Nagpur Metro and Nagpur AIIMS Hospital, Prime Minister Narendra Modi joined the protestors in a public meeting. Specially, some parties use shortcuts for the development of the country as well as the politicians. This is very dangerous for the development of the country. Modi has targeted you through this statement. Prime Minister Narendra Modi speaking at a public meeting after dedicating Samridhi Highway, Nagpur Metro and Nagpur AIIMS Hospital. At this time Prime Minister Narendra Modi praised Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis. Maharashtra's development is fast due to the double engine government, as Narendra Modi made it clear.

Narendra Modi’s indirect target aap : काही पक्षांचा ‘शॉर्टकर्ट’ देशाच्या विकासासाठी घातक

नागपूर ।समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो (Samridhi Highway, Nagpur Metro) तसेच नागपूर एम्स रुग्णालयाचे (Nagpur AIIMS Hospital)लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Prime Minister Narendra Modi)जाहीर सभेत विरोधकांना टोला लगावला. विशेष म्हणजे काही पक्ष राजकारणात तसेच देशाच्या विकासातही शॉर्टकर्टचा वापर करतात. देशाच्या विकासासाठी हे अतिशय घातक आहे.या वक्तव्यातून मोदींनी आपवर (AAP) निशाणा साधला. 

समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो तसेच नागपूर एम्स रुग्णालयाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेत बोलत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

  मोदी म्हणाले,   महाराष्ट्रात झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण हे या गोष्टीचे प्रमाण आहे की, राज्यात डबल इंजिन सरकार वेगाने काम करत आहे. समृद्धी महामार्गामुळे केवळ नागपूर-मुंबई नव्हे तर राज्यातील 24 जिल्हे आधुनिक कनेक्टिव्हीटीने जोडली जाणार आहेत. शेतकरी, उद्योजक, विविध धार्मिक स्थळांना जाणारे भाविक यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होणार आहे.  यावेळी  विरोधकांवरही निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काही पक्ष राजकारणात तसेच देशाच्या विकासातही शॉर्टकर्टचा वापर करतात. देशाच्या विकासासाठी हे अतिशय घातक आहे. या वाक्यातून मोदी यांनी अप्रत्यक्षपणे आपवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. तर, काही पक्षांची विकासाची कामे म्हणजे आमदनी अठ्ठनी, खर्चा रुपया अशी आहेत. यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असेही मोदी म्हणाले.(Narendra Modi’s indirect target aap :Some party’s ‘shortcuts’ are fatal for the country’s development )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *