Narendra Modi: Give power to Mumbai Municipal Corporation!

Narendra Modi:मुंबई महापालिकेत सत्ता द्या!

मुंबई।मुंबई महापालिकेत आम्हाला सत्ता द्या, (Give power to Mumbai Municipal Corporation) असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी   मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) प्रचाराचा नारळ फोडला. तसेच  मागच्या काळात विकासात राजकारण आणले गेले. प्रत्येक कामात टांग टाकली गेली. त्यामुळे नुकसान झाले, अशी टीकाही    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  ( Criticism on Uddhav Thackeray) यांच्यावर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते   मुंबईत सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण झाले. त्यानंतर त्यांनी बीकेसी मैदानावर जनसमुदायाला संबोधित करताना सत्ता देण्याचे आवाहन मुंबईकरांना केले. 

 यावेळी  मोदी म्हणाले, , प्रत्येक कामात विरोधकांनी अडथळे आणले. मेट्रो कारशेडमध्येही अडथळे आणले. हे नुकसानकारक ठरते. आता दिल्लीपासून महाराष्ट्रपर्यंत अशा गोष्टी होऊ नये म्हणून सर्वांनी जबाबदारी उचलायला हवी. स्वनिधीद्वारे पथविक्रेते, छोट्या व्यावसायिकांना लाभ झाला. 

  भारताविषयी जगात सकारात्मकता आहे. आज सर्वांना वाटते की, भारत आपल्या सामर्थ्याचा मोठ्या उत्तमपणे उपयोग करीत आहे. भारत ते करीत आहे जे गतीने विकास आणि समृद्धीसाठी आवश्यकता आहे. भारताकडे अभुतपूर्व आत्मविश्वास आहे. शिंदे – फडणवीसांचे सरकार डबलइंजिन आहे. या सरकारवर लोकांचा विश्वास आहे.

 मुंबईला पैशाची कमतरता नाही. मात्र, पैसा भ्रष्टाचारात गेल्यास विकास कसा होईल? पैसा बँकांमध्ये पडून राहिल्यास विकास कसा होणार, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, मुंबईच्या विकासासाठी स्थानिक पातळीवर सत्ता हवी. मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास विकास वेगाने होईल, असा दावा त्यांनी केला.

मोदी म्हणाले, भारत स्वातंत्र्यानंतर मोठे स्वप्न  पाहण्याचे साहस करीत आहे. मागील सरकारच्या काळात जगाकडून मदत मागितली जात होती. मात्र आजचा भारत सक्षम असून स्वातंत्र्याच्या अमृत वर्षात विकसित भारताची उत्सुकता जेवढी भारताला आहे. तेवढा आशावाद जगालाही आहे.(Narendra Modi: Give power to Mumbai Municipal Corporation!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *