पुणे । जी २० परिषदेच्या लोगोवर (Lotus on the logo of G20 Parishad) भाजपाचे चिन्ह असलेल्या कमळाचा फोटो आहे. ते कमळ भाजपाचे ( BJP) आहे की, भारताचे आहे. यावरून विरोधकांकडून टीका होत असताना केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Union Micro, Small and Medium Enterprises Minister Narayan Rane) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.जी २० परिषदेच्या लोगोवरील कमळ भारताचे कमळ असून त्या कमळला एक अर्थ आहे. हे कमळ भाजपाचे म्हणून घेतले तरी माझी काही हरकत नाही,असे राणे यांनी नमूद केले.
पुण्यात जी-२० परिषदेचे उदघाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.ते म्हणाले , शाश्वत विकास म्हणजे कमळ. जो भाजपात येईल. तो स्वतः चा पण विकास करेल आणि आपला देखील विकास करेल, असेही राणे म्हणाले.
राज्य सरकार बदलले की,धोरणामध्ये बदल होतो.आजवर घडत आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उद्योग बाहेर गेले आहेत.त्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले की,सरकार बदलले की,सरकारने घेतलेले निर्णय बदलतात. मी या मताशी सहमत नाही.राज्यात ३५ वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक मंत्रिपदे भूषविली आहेत. एखादा निर्णय राज्याला, जनतेला भविष्याच्या दृष्टीने पोषक नसेल तर तो निर्णय अपवादात्मक बदलला जातो. मात्र, त्यांनी घेतलेला सहसा बदलला जात नाही.पण सरकार बदलल्यानंतर दृष्टीकोन बदलतो, असेही राणे म्हणाले.