मुंबई ।देशात २०१४ पासून आणीबाणी सुरू झाली आहे. मागील ८ वर्षात देशाला मान खाली घालण्यासाठी ठरवून उपाययोजना करण्यात आली आहे. आज रुपया कधी नव्हे इतका खाली घसरला आहे. भारताला इतर देशांची माफी मागावी लागत आहे. मात्र या परिस्थितीमध्ये सुद्धा केंद्र सरकारशी दोन हात करून जनतेचे प्रश्न मांडले म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पण त्यांनी सांगितले आहे ‘ हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे’. त्यानुसार काँग्रेस पक्ष (Congress party) आंदोलन करत आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या निषेधार्थ मुंबई कॉंग्रेसतर्फे सलग चौथ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. दक्षिण मुंबईतील हँगिंग गार्डन पासून राजभवनपर्यंत काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात महामोर्चा काढण्यात आला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच गांधी परिवार यांच्यावर मोदी सरकार (Modi Government )सूडबुद्धीने कारवाई करत आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये पोलिसांना पाठवून लाठीचार्ज करणे, तटबंदी करणे, तसेच हुकूमशाही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. याचा तीव्र निषेध म्हणून हे आंदोलन होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशात २०१४ पासून आणीबाणी सुरू झाली आहे. मागील ८ वर्षात देशाला मान खाली घालण्यासाठी ठरवून उपाययोजना करण्यात आली आहे. आज रुपया कधी नव्हे इतका खाली घसरला आहे. भारताला इतर देशांची माफी मागावी लागत आहे. परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा केंद्र सरकारशी दोन हात करून जनतेचे प्रश्न मांडले म्हणून राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. परंतु त्यांनी सांगितले आहे, हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे. लोकशाही सोडून हुकूमशाही देशात सुरू आहे. इंग्रज कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस ब्रिटिशांशी लढली व आता काँग्रेस मोदी विरोधात लढत आहे. (Congress fought against British and now Congress is fighting against Modi) ही लढाई रस्त्यावर लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले . त्याचप्रमाणे केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर काम करते याचा पुरावा द्यायची गरज नाही. सत्तेची गर्मी भाजपला (BJP) झाली आहे.त्यांचे राज्यातील नेते बोलतात, ईडी (ED) उद्या लागेल व लागते, असे स्पष्ट करून ही सुड भावनेच्या पोटी जाणीवपूर्वक कारवाई केली जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.