Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

Nana Patole:आता न्यायालयानेच सुमोटो काढून लोकशाही वाचवावी!

मुंबई । नागपूरचे ज्येष्ठ वकील सतीश उके यांच्यावर ईडीकडून (raided by the ED) धाडी टाकण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्या वकिलांनाही अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत  उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो काढावा आणि देशातील लोकशाही (save the country’s democracy)  वाचवावी , अशी विनंती नाना पटोले यांनी न्यायालयांना केली आहे.  

  वकील सतीश उके यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईचा   नाना पटोले यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांना त्रास दिला जात आहे,  खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पुढे आमच्यावरही असे खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी शंका नाना पटोले यांनी व्यक्त केली. ईडी तपास यंत्रणेच्या माध्यमातून पैशांचा झालेला घोटाळा बाहेर काढण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली. भाजपच्या एका खासदाराचा घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र आता ईडीच्या माध्यमातून विरोधकांनाच दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नाना पटोले ( Nana Patole) यांनी  यावेळी केला.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात… 
ज्येष्ठ वकील सतीश उके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Senior advocate Satish Uke had filed a petition in the Mumbai High Court against Union Minister Nitin Gadkari) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. यासोबतच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सतिष उके यांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्याबाबतची कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी ईडीने कारवाई केली का, अशी शंका नाना पटोले यांनी उपस्थित केली. भाजपच्या विरोधात कोणी बोलेल तर त्याचे तोंड दाबण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *