No program yet for Rahul Gandhi-Uddhav Thackeray meeting

Nana Patole: राहुल गांधी-उद्धव ठाकरे भेटीबाबत अजून  कोणताही प्रोग्राम नाही!

मुंबई। काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  हे उद्धव ठाकरे यांची  मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress state president Nana Patole) नाना पटोले यांनी राहुल गांधींचा असा कोणताही प्रोग्राम नाही(Rahul Gandhi-Uddhav Thackeray meeting) असे स्पष्ट करत या भेटीबाबतची शक्यता तूर्तास तरी फेटाळून लावली आहे. त्यातही राहुल गांधी  हे भाजपविरुद्ध विरोधकांची मोट बांधत असल्याचेही  नाना पटोलेंनी (Nana Patole) सांगितले.

सद्यस्थितीत सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर काँग्रेसकडून नाराजीचे सूर उमटल्याचे बोलण्यात येत होते.

या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. त्यात भाजपकडून आधी सावरकरांची माफी मागा मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवा अशी भूमिका जाहीर केली आहे. 

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी-उद्धव ठाकरे भेटीबाबत अजून काहीही ठरलेले नाही.  परवा  नितीश कुमार, तेजस्वी यादव हे  राहुल गांधींना भेटले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतली. काल राहुल गांधी आणि शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांची देखील भेट झाली. मात्र राहुल गांधी हे मुंबईत येणार असल्याचा कोणताही प्रोग्राम सध्या तरी नाही. याआधी देखील वेणुगोपाल  महाराष्ट्रात येणार असल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळले होते. मात्र भाजपविरोधी दलांची मोट बांधण्याचे काम सुरु आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *