सातारा ।शिवरायांच्या विचारांनी देशाला एकत्र ठेवले. ते अनेकांचे प्रेरणास्थान आहे. पण , महापुरुषांचा अवमान सातत्याने होत आहे. देशात सर्वधर्मसमभावांची व्याख्या बदलली आहे का? या देशाचे तुकडे झाल्यास राजकारणी जबाबदार असतील (politicians will be responsible if this country is divided)असा इशारा भाजप (BJP) खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosle) यांनी पत्रकार परिषदेत दिला. शिवाय’मी हातात बांगड्या घातल्या नाही आणि मी हतबलही झालो नाही.’ मी लढणारा आहे, रडणारा नाही.अशी रोखठोक भूमिकाही मांडली.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, राज्यपालांवर कुणीही बोलण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे मी राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आवाज उठवण्याचे ठरवले. या आधीच्या पत्रकारपरिषदेत मी रडलो नाही. भावना फक्त अनावर झाल्या होत्या. मी रडणाऱ्यांपैकी नाही. मी लढणारा आहे. आता लढणारच नाही तर दाखवणार आहे. शिवरायांच्या नावाचा वापर राजकारणासाठी होत आहे(Shivarai’s name is being used for politics). चित्रपट, लिखानातून शिवरायांचा अवमान केला जात आहे.याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अजेंडा काहीही असो पण तुमचा अजेंडा जोपर्यंत छत्रपतींचे (Chhatrapati) विचार सांगतात, तो आचरणात आणा. तो न आणल्यास त्या विचारांचा काय उपयोग? थोडे इतिहासात जाऊ. भारताचे अखंड भाग पाकिस्तान आणि बांग्लादेश होते. त्याआधी शिवरायांचा जन्म झाला पण विचार सोडले की, अखंडता आपण गमावून बसलो. या देशाचे तुकडे करायचे का तर नाही. शिवरायांच्या विचारांनी देशाचे विचार अखंड ठेवले. त्यांच्या विचारांचा विसर पडला तर कसे होईल.
प्रत्येक राज्याचा प्रमुख काहीही विधाने करीत आहेत. आपण खपवून घेणार आहोत का? प्रत्येक पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. काहीही वक्तव्य शिवरायांबद्दल करायचे हे आज नाही आधीपासून सुरू आहे. आपण कोडगे झालो आहोत का? एक तर शिवरायांबद्दल भूमिका स्पष्ट करा अन्यथा नाव घेऊ नका.असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
तुम्हीच जबाबदार राहाल
क्षणभर सत्तेत राहण्याला मी महत्व देत नाही. आपली भूमिका राजकीय पक्षांनी स्पष्ट करा आणि सर्वधर्म समभावाचा खुलासा करावा. देशाची फाळणी झाली त्यातून काय मिळाले. शिवरायांच्या विचारांचा विसर पडला तर जबाबदार कोण तर हीच लोक राहील.
अवमान करणाऱ्यांविरोधात राष्ट्रद्रोहाचं कलम लावा
छत्रपतींच्या किंवा कोणत्याही महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर, लिखाण करणाऱ्यांवर देशद्रोहानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आज राज्यपाल बोलले आहेत, कोणीही बोलेल, हळू हळू फॅशन होऊन जाईल. आपण शांत बसणार आहोत का? असं चालत राहिलं तर पुढच्या पिढींना काय सांगणार आहोत.