नवी दिल्ली। वाढत्या महागाईवरून (rising inflation) संसदेचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजत आहे. विरोधकांच्या आक्रमकपणामुळे मोदी सरकारची कोंडी होत आहे.त्यात इंधनाचे वाढते दर पाहता, आता भाज्या कच्च्या खाण्याची वेळ ओढावल्याचा मुद्दा उपस्थित करत तृणमूल (TMC) काँग्रेसच्या खासदारांनी चक्क कच्चे वांगे खाऊन मोदी सरकारचा(Modi government) निषेध केला.
महागाईवरील चर्चेवरून झालेल्या गदारोळानंतर सोमवारी लोकसभेत या विषयावर चर्चा झाली. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी (Trinamool Congress MP Kakoli Ghosh Dastidar opposed inflation in a unique way)अनोख्या पद्धतीने महागाईचा विरोध केला.
लोकसभेत भाषण करत असताना अचानक कच्चे वांगी खाऊन त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
त्या म्हणाल्या की, देशात गॅस सिलिंडरच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की शिजवलेल्या भाज्या खाण्याऐवजी कच्च्याच खाव्यात.
मोदी सरकारच्या काळात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्याने भाजी शिजवणे कठीण झाले आहे. असे स्पष्ट करत त्या म्हणाल्या की, मला ही भाजी कच्ची खावी लागेल कारण एलपीजी सिलेंडरची किंमत चार पटीने वाढली आहे.(Modi government protests over rising inflation: ‘They’ ate raw brinjal in Lok Sabha)