मुंबई ।मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारला आता 6 महिने झाले आहेत. मात्र या 6 महिन्यांत एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला. तेव्हापासून सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगत आहे मात्र आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची (expand cabinet) माहिती दिली आहे. त्यांच्या मते, २० ते २२जानेवारीदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की , मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मी याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे सांगितले. या अडचणी १५ तारखेपर्यंत दूर होतील. त्यानंतर २०-२२ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज आहे.
सरकारमधील अनेक राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री भरायची आहेत. काही गोष्टींमुळे विस्तार रखडला आहे पण विस्तार होणार नाही असे नाही, तो करावाच लागणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावरही टीका केली. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे रिकामी होईल. शिवसेनेचे उर्वरित आमदार पुढील८-१० दिवसांत शिंदे गटात सहभागी होतील.
शिवसेनेत सकाळी सुरू असलेल्या भोंग्यामुळे ही वेळ येईल. विशेषतः भविष्यात निवडणूक लढवायची किंवा नाही असा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरेंपुढे उभा राहील.असेही ते म्हणाले.