What percentage reservation for which castes in Maharashtra?

Maratha Reservation:महाराष्ट्रात  जातीनिहाय  ‘असे ‘ आहे  आरक्षण!

पुणे । मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation)  मुद्द्यावरून राज्यभरात ठिकठिकाणी दंगली, जाळपोळ होत आहेत. अनुसूचित  जाती जमातीला, इतर मागासवर्गीयांना, विशेष मागास प्रवर्गाला आरक्षण आहे. मात्र मराठा समाजाला(Maratha community)  आरक्षण नसल्याने आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत.आता आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने राज्यसरकारचीही कोंडी झाली आहे.  वास्तविक आरक्षणाचा विषय केंद्राच्या पर्यायाने संसद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत असतानाही आरक्षणासाठीचे   आंदोलन महाराष्ट्रात ( Maharashtra) पेटले आहे. 

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोणत्या जातींना किती टक्के आरक्षण (What percentage reservation for which castes in Maharashtra?)  आहे हेही पाहणे महत्वाचे आहे. 1) एससी : 13 टक्के2) एसटी : 07 टक्के 3) ओबीसी :  19 टक्के 4) विमुक्त + भटक्या जाती (4 प्रवर्ग) : 11 टक्के 5) एसबीसी अ : 02 टक्के असे एकूण   52 टक्के आरक्षण महाराष्ट्रात असले तरी प्रत्यक्षात ६२ टक्के आरक्षण आहे. 

महाराष्ट्रात एकूण 52 टक्के आरक्षण दिले जात असले तरीसुद्धा आरक्षणाच्या यादीत ईडब्लूएसला 10 टक्के आरक्षण दिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात एकूण मिळून 62 टक्के आरक्षण नोकरी व शिक्षणात दिले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला राज्य सरकार किती टक्के आरक्षण देणार याकडे मराठा समाजासह सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.(Maratha Reservation: Caste-wise reservation in Maharashtra is ‘such’!) 

अन्य राज्यातील आरक्षणाची आकडेवारी 

अन्य राज्यात आरक्षण पुढील प्रमाणे- हरियाणा आणि बिहार : एकूण 60 टक्के आरक्षण. तेलंगणा : एकूण 50 टक्के आरक्षण. गुजरात :  एकूण 59 टक्के आरक्षण.तामिळनाडू : एकूण 69 टक्के आरक्षण. छत्तीसगड : एकूण 82 टक्के आरक्षण.मध्यप्रदेश : एकूण 73 टक्के आरक्षण.झारखंड : एकूण 50 टक्के आरक्षण. राजस्थान : एकूण 64 टक्के आरक्षण. केरळ : एकूण 60 टक्के आरक्षण. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *