Manoj Jarange: Maratha reservation, government now 'deadline' till January 2

Manoj Jarange:मराठा आरक्षण,सरकारला आता २ जानेवारीपर्यंत ‘डेडलाईन’ 

आंतरवाली सराटी।मराठा आरक्षणासाठी ( Maratha reservation)  सुरु असलेली लढाई ही सुरुच राहणार आहे. मात्र मी आता सरकारला  २ जानेवारीपर्यंतचा वेळ (‘deadline’ till January 2)   दिला आहे. दुसऱ्या टप्प्यातील  उपोषण आता मागेही घेतले आहे. अशी भूमिका उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मांडली मात्र आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या, असं मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) यावेळी म्हटलं आहे. 

 सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर प्रदीर्घ चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याची भूमिका घेतली. पण  जरांगे पाटलांनी २ जानेवारीची डेडलाईन सरकारला दिली आहे. 

२४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून न देण्यास जरांगे पाटील यांनी विरोध केला.  सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती मनोज जरांगे यांना केली. पण जरांगे पाटील २४ डिसेंबर या तारखेवर ठाम राहिले. त्यानंतर तारखेबाबत बराच वेळ चर्चा देखील करण्यात आली. अखेर त्यांनी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचे  म्हटली  आहे. तसेच  २ जानेवारीनंतर मुंबईचं नाक बंद करु असा इशाराही  दिला आहे.(Manoj Jarange: Maratha reservation, government now ‘deadline’ till January 2)

विशेष अधिवेशन बोलाविण्याची तयारी 

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ८ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *