Manipur violence:मोदी अजूनही झोपेत … 

नवी दिल्ली । भाजपा नेते व बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी (BJP leader and spokesperson of the party in Bihar Vinod Sharma)    पक्षाचा राजीनामा दिला.  मी फार जड अंत:करणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi )यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. मणिपूरसारखी घटना (Manipur violence)  आधी कधीही कुठे घडली नाही. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही झोपेतच (Modi still asleep) आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना पदावरून हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही , अशी संतप्त प्रतिक्रिया विनोद शर्मा ( Vinod Sharma) यांनी दिली आहे.एकप्रकारे भाजपला हा ‘घरचा आहेर ‘ मिळाला आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षांच्या INDIA या आघाडीने संसदेत सत्ताधारी एनडीए व विशेषत: भाजपाविरोधात विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी विरोधी पक्षांचे खासदार सरकारचा निषेध करण्यासाठी चक्क काळे कपडे घालून संसदेच्या कामकाजात सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर आता भाजपाच्याच एका नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतानाच विनोद शर्मा यांनी आपल्या पक्षालाही लक्ष्य केलं आहे.  भाजपा नारी शक्ती, बेटी बचाओ, हिंदू राष्ट्र, सनातन धर्माच्या गोष्टी करते. हा आपला सनातन धर्म आहे का? एक माणूस म्हणून मी हे सगळं सहन करू शकत नाही. त्यामुळे मी अन्यायाविरोधात बोलत आहे , असे  विनोद शर्मा म्हणाले.

मणिपूरमध्ये ४ मे रोजी घडलेल्या एका संतापजनक घटनेचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात देशभर व्हायरल झाला. दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या या व्हिडीओमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात अधिवेशन सुरू होण्याआधी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. मात्र, घटनेच्या दोन महिन्यांनंतर मोदी त्यावर व्यक्त झाले, त्यातही संसदेत न बोलता फक्त माध्यमांसमोर त्यांनी  भूमिका मांडल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात लावून धरला आहे.(Manipur violence: Modi still asleep…)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *