कोलकाता। देशात विद्यमान लोकसभेची (Lok Sabha) मुदत २०२४ मध्ये संपत आहे. त्यानुसार भाजपने (BJP) आतापासून जोरदारपणे तयारी सुरु केली आहे. त्यासाठी देशभरात हेलिकॉप्टर्सही बुक केले आहेत. जेणेकरून विरोधकांना प्रचार करण्यापासून वंचित ठेवण्याची रणनीती आहे.असा दावा करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी जर भाजप (BJP)तिसऱ्यांदा सत्तेत आला तर देशात हुकूमशाही (dictatorship) लागू करेल असा इशाराही दिला.
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी सोमवारी (२८ ऑगस्ट) रोजी पक्षाच्या युवक मेळाव्याला संबोधित करत असताना भाजपावर (BJP)जोरदार टीका केली. भाजप कदाचित याचवर्षीच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) घेऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपकडून देशभरात हेलिकॉप्टर्स बुक करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच भाजपा जर तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशात हुकूमशाही लागू करेल, असा इशारा (Mamata Banerjee) दिला.
लोकसभेच्या निवडणुका यावर्षी डिसेंबर महिन्यात किंवा नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्या म्हणाल्या. भाजपाने आताच देशातील समाजासमाजामध्ये वैमनस्य निर्माण केले आहे, जर ते पुन्हा सत्तेवर आले तर आपला देश द्वेषावर आधारित राष्ट्र बनेल, असेही बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. Mamata Banerjee: Dictatorship in the country if BJP comes to power for the third time!