नवी दिल्ली। भाजपने (BJP) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024:) तयारी आतापासून सुरु केली आहे. देशभरात पक्षासाठी कमकुवत असलेल्या २०४ जागांचा शोध घेत (Researching 204 weak areas) त्या जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष यांच्या (Prime Minister and the Party President) पोस्टरवर प्रभावी व्यक्तीला स्थान दिले जाणार आहे. जेणेकरून जातीय आणि सामाजिक समीकरण साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
येत्या २८-२९ डिसेंबरला हैद्राबाद येथे होणाऱ्या बैठकीत धोरण निश्चित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे मात्र सध्या कोरोनाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या पर्यायाने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आक्षेप घेणाऱ्या भाजपकडून लोकसभेच्या तयारीची बैठक होईल की पुढे ढकलली जाईल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. बिहार राज्याच्या ४० लोकसभा जागांची समीक्षा करण्यात येत आहे. बिहारच्या ४० पैकी २२ जागा भाजपकडून सामाजिक व जातीय समीकरणाच्या हिशेबाने कमकुवत श्रेणीत ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय दक्षिणेतील ८४ जागा कमकुवत म्हणून अधोरेखित केल्या आहेत. लोकसभेसाठी जागांच्या ४ श्रेणी ठरविण्यात आल्या आहेत. त्यात सर्वोत्तम, चांगल्या, सुधारणायोग्य व अत्यंत खराब. डी श्रेणीची जागा म्हणजे तिथे भाजपची विजयाची शक्यता खूप कमी आहे. मात्र, या जागांवर नंबर दोनची स्थिती राहू शकते.असा निष्कर्ष भाजपमधील व्यूहरचनाकारांचा आहे.
पक्ष कमकुवत जागांचे जातीय व सामाजिक समीकरण तयार करत आहे. येथील प्रभावी व्यक्तीला भाजपच्या बॅनर-पोस्टरवर पीएम मोदी व भाजप अध्यक्षांसह जागा दिली जाईल. अशा लोकांचा गट बनवून पीएमशी थेट ऑऑनलाइन संवाद साधला जाणार आहे. जेणेकरून त्याचा आपसुक प्रभाव जनतेमध्ये होईल आणि जागा जिंकण्याचे प्रमाण वाढेल.
राज्यनिहाय कमकुवत जागा
देशातील राज्यनिहाय कमकुवत जागांचा भाजपने शोध घेतला असून त्या पुढीलप्रमाणे तामिळनाडू (३६),आंध्र (२५),महाराष्ट्र (२४),बंगाल (२३)बिहार (२२),केरळ( २०),तेलंगण( १२)यूपी (१२),ओडिशा (१२),कर्नाटक (५),राजस्थान (२),छत्तीसगड( २),आसाम ( २),झारखंड (२),अरुणाचल (१),हिमाचल (१),उत्तराखंड (१),मप्र (१) गोवा(१). (Loksabha Election 2024: BJP aims to win 204 weak places in the country)