मुंबई। भर पावसात भाषण करून साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांनी बापमाणूस’ कसा असतो याचा दाखला दिला. आता त्याच साताऱ्यात पक्षाच्या विभाजनानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Ajit Pawar’s Nationalist Congress party) महामेळावा होणार आहे. ३ मार्चला होणाऱ्या या महामेळाव्यातून लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024} रणशिंग फुंकण्याचा निर्धार आता करण्यात आला आहे. त्यामुळे ‘जाणताराजा’ला भक्कम साथ देणारे सातारकर ‘बोले तैसा चाले’ला कितपत थारा देतात हाच मुद्दा आगामी काळात गाजणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी (Satara Lok Sabha Constituency) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे ३ मार्चला साताऱ्यात पक्षाचा महामेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024} रणशिंग फुंकण्याचा निर्धार मुंबईत झालेल्या आमदार व पदाधिकारी यांच्या बैठकीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत प्रदेश राष्ट्रवादी भवनात झाली. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सर्वांनी सातारा व माढा लोकसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपात आपण आग्रही राहण्याची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आपण स्वतः सातारा लोकसभेसाठी आग्रही आहोत, कोणत्याही परिस्थितीत आपण ही जागा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माढा लोकसभेसाठी संजीवराजे नाईक निंबाळकर हे इच्छुक असून त्यासाठीही आग्रह धरण्याबाबत चर्चा झाली. पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळाले असल्याने साताऱ्यात पक्षाची बांधणी, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत व ताकतीने उभे करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली. तसेच येत्या तीन मार्चला साताऱ्यात पक्षाचा महामेळावा घेऊन लोकसभेचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार यावेळी त्यांनी केला.सातारा लोकसभेसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व माढा लोकसभेसाठी राम राजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर इच्छुक आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ मिळण्यासाठी ताकत लावण्याचा निर्धार करण्यात आला. (Lok Sabha Election 2024: Now Satara is the target of Ajit Pawar, Maha Mela on March 3!)