punecongress ababagul Letterbomb' even in Congress in Pune Pune Lok Sabha constituency

‘Letterbomb’ even in Congress in Pune; पुण्यात काँग्रेसमध्येही ‘लेटरबॉम्ब’;आबा बागुलांचे थेट मुद्द्यावर बोट!

पुणे । पुणे लोकसभा मतदारसंघात ( Pune Lok Sabha constituency) उमेदवारीवरून काँग्रेसच्या( Congress) गोटात गटातटाचे राजकारण पेटले आहे ;पण त्यात पक्षाची वाताहत होत आहे. यंदाही अर्ध्या डझनाहून अधिक उमेदवार इच्छुक मात्र कुणाला उमेदवारी हवी ,कुणाला नको यावरून ‘पारा’ यण होत आहे. चार -पाच मंडळी मुंबई गाठतात आणि हवे तसे चित्र निर्माण करतात मग पक्षश्रेष्ठीही कोणतीही खातरजमा न करता निर्णय घेतात आणि शेवटी पक्षाच्या पदरी पराभवच. असेच आजवरचे चित्र. मग पक्ष कसा बळकट होणार हा प्रश्न उपस्थित करून यंदाही हाच प्रकार टाळण्यासाठी लोकसभेसाठी इच्छुक असलेले पण गटातटाच्या राजकारणाला वैतागून अलिप्तपणाची भूमिका घेणारे माजी उपमहापौर आबा बागुल (Former Deputy Mayor Aba Bagul)आता आक्रमक झालेत. आधी जाहीरसभेतून ”पुणेकर मतदारांचा कौल घ्या मगच महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवा” असे पत्र (‘Letterbomb’ even in Congress in Pune) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांना पाठवून त्यांनी थेट मुद्द्यावर बोट ठेवले आहे.
 
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना आबा बागुल यांनी पत्र पाठवून काँग्रेस सक्षम झाली पाहिजे, कार्यकर्त्यांचे श्रम सार्थकी लागले पाहिजे.अशा भावना व्यक्त केल्या आहेत. पत्रात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,
लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे. आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणे सहजशक्य आहे. त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी जाहीर सभा घ्या. पुणेकर मतदार सुज्ञ आहेत.ते जो कौल देतील,त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. तुम्ही आम्हाला कधीही सांगा, कुठे सभा घ्यायची तेही सांगा.  हजारो संख्यने   पुणेकर या सभेला एक हजार एक टक्के उपस्थित राहतील  याची मी  ग्वाही  देतो. तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेऊनच लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. असे नमूद केले आहे.
जाहीर सभेच्या आयोजनासाठी   निर्देश द्या
मी गेली ४० वर्षाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाचे कार्य करीत आहे. तब्बल ३० वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहे.  प्रभागच काय वॉर्ड रचना बदलूनही  सलग सहा वेळा लोकप्रतिनिधी म्हणून  निवडून आलेलो आहे. शहर विकासाचे  व्हिजन आणि काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे याची  मला सदैव  जाण  असल्यानेच जनतेनेही भरभरून मतदान केलेले आहे. त्यामुळेच सहा टर्म लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी स्वीकारले आहे आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ यावर जनमानसातूनच शिक्कामोर्तब झाले आहे. मला   समाजकारण -राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे.मी खात्रीपूर्वक नमूद करतो की, यंदा पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. त्यासाठी जनमताचा कौल घ्या,जाहीर सभा घेण्यास मला निर्देश द्या, मी सक्षम व तयारीत  आहे. तसे झाल्यास पुणेकरांचा कौलही  कळेल आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मितीही होईल. (‘Letterbomb’ even in Congress in Pune)  आपण आता गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेऊन जाहीर सभेच्या आयोजनासाठी मला निर्देश द्या आणि त्यानुसारच ‘कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा ‘  हे सूत्र  लोकसभेसाठी यंदा अवलंबवा याकडे लक्ष वेधून आबा बागुल यांनी लोकसभेसाठी ते प्रबळ आणि सक्षम दावेदार असल्याचे ठामपणे पत्रात सांगितले आहे.
तेच ते  ‘यशस्वी कलाकार’…
 जर तेच ते  ‘यशस्वी कलाकार'( मोठ्या मताधिक्क्याने पराभव पत्करणारे ) पुन्हा लोकसभेसाठी दिल्यास निकालही नेहमीप्रमाणे ‘ यशस्वी’च  लागेल.हीच मंडळी आपल्यापुढे वेगळे चित्र निर्माण करतात आणि नंतर  जबाबदारीही  पेलत नाहीत, घेत नाहीत  आणि पराभव झाल्यानंतर मौनव्रतात जातात. परिणामी सर्वांचेच श्रम वाया जातात.गेली अनेक वर्षे शहरात हेच चित्र आहे. आता हेच चित्र यंदा बदलण्याची अपेक्षा व्यक्त करताना     ‘ कौल  पुणेकर मतदारांचा , उमेदवार महाविकास आघाडीचा’ हे सूत्र यंदा अवलंबून   जाहीर सभेतून पुणेकरांकडून    मिळणाऱ्या कौल नुसार  उमेदवार ठरवावा अशी थेट मागणी आबा बागुल यांनी  केली आहे.  (‘Letterbomb’ even in Congress in Pune; Aba Bagul’s finger straight to the point!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *