मुंबई । युद्ध नौका आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.पाच दिवसाच्या अज्ञातवासातून बाहेर येत सोमय्या यांनी हे जाहीर केले होते कि, आणखी एक घोटाळा बाहेर काढणार. त्यानुसार आता सोमय्यांनी नवा आरोप (new allegation) केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनाच त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. मुख्यत्वे हवाला किंग नंदकिशोर त्रिवेदी यांना कुठे लपवलंय? असा प्रश्न किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) उपस्थित केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोमय्या यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात 29 कोटी रुपये काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असे सोमय्या म्हणाले.
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवलं आहे? त्याची माहिती जनतेला द्या अशी माझी विनंती आहे. नंदकिशोर त्रिवेदी हे उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर आहेत. त्यांच्या मदतीने उद्धव ठाकरेंनी मनी लाँड्रींग केले आहे. नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहेत? हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे . आदित्य ठाकरे, तेसज ठाकरे, श्रीधर पाटणकर या सगळ्यांसोबत नंदकिशोर चतुर्वेदीचे अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचे बाहेर आले आहे असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.