BJP leader Kirit Somaiya's tongue slipped once again. While criticizing Minister Anil Parab, Somaiya also criticized the Chief Minister. Chief Minister Uddhav Thackeray has spoken out against 19 bungalows. I have not seen a liar and a sly Chief Minister like Uddhav Thackeray, said Somaiya.

Kirit Somaiya in trouble ?:’आयएनएस विक्रांत’साठी गोळा केलेला निधी भाजपच्या ‘खात्या’त !

मुंबई। अनेक कथित  घोटाळ्यांचे मुद्दे बाहेर काढून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री – नेत्यांना जेरीस आणणारे भाजप नेते (BJP leader Kirit Somaiya) किरीट सोमय्या हेच आता अडचणीत आले आहेत. युद्धनौका (warship INS Vikrant)  आयएनएस विक्रांतसाठी  गोळा केलेला मदतनिधी पक्षाच्या खात्यात जमा केल्याची सारवासारव करून अटक टाळण्याचा प्रयत्न सोमय्यांनी केला असला तरी दुसरीकडे एकाकी पडू नये,यासाठी भाजपला (BJP)  या प्रकरणात खेचण्याची खेळी केली आहे.   

  युद्धनौका आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीबाबत शिवसेनेचे नेते (Shiv Sena leader MP Sanjay Raut) खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यासह त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. या कथित घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी अटक टाळण्यासाठी भाजपा नेते किरीट  सोमय्यांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आम्हाला या प्रकरणात आरोपीची चौकशी करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली.
सुनावणी दरम्यान किरीट सोमय्यांचे  वकिल अशोक मूंदरगी यांनी न्यायालयात सांगितले की, आम्ही निधी जमा करायला राज्यपाल भवनात गेलो. त्यांनी म्हटले की, अशाप्रकारे निधी जमा करणारी कोणतीही तरतूद नाही. त्यानंतर आम्ही सर्व रक्कम पक्षाकडे जमा केली.त्यावर युक्तीवाद करताना सरकारी वकील प्रदीप घरात म्हणाले, आम्हाला या प्रकरणात आरोपींची चौकशी करण्याकरिता कोठडी आवश्यक आहे. आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी  ज्या कोणी लोकांनी पैसे गोळा केले आहेत. त्या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे. किरीट  सोमय्यांनी पक्षाला निधी जमा केला असेल तर, त्याची देखील चौकशी करण्यात येईल.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद न्यायालयात पूर्ण झाला आहे. त्यावरील निकाल न्यायालयाने संध्याकाळपर्यंत राखून ठेवला आहे. संध्याकाळी निकाल जाहीर करणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांना  दिलासा मिळतो का अटक होते?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष  लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *