मुंबई ।भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पुन्हा एकदा जीभ घसरल्याचे दिसून आले. सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी 19 बंगल्यांबाबत थोतांड मांडले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा खोटारडा आणि लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही, अशा शब्दात सोमय्या यांनी टीका केली आहे.
अनिल परब (Anil Parab) यांनी त्यांच्या रिसॉर्टचे कर भरले आहेत. तसेच सोळा हजार चौरस फुटावर बांधकाम केले आहे. तसेच लाईट बिलही त्यांच्या नावाने आहे. त्यामुळे ते सदानंद कदम यांच्या नावाने रिसॉर्ट असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात तेच मालक आहेत. २५ कोटी रुपये यासाठी कुठून खर्च केले याचा हिशोब ते देऊ शकत नाहीत, म्हणूनच त्यांच्यावर कारवाई झाली आहे. केवळ पर्यावरणाची तक्रार आहे म्हणून कारवाई झाल्याचे ते भासवत असले तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे, असा आरोपही सोमैया यांनी परब यांच्यावर केला आहे. मंत्री अनिल परब हे नौटंकी करत आहेत. ईडीने छापे मारल्यानंतरही आता तो मी नव्हेच या नाटकातील भूमिका ते करत आहेत. या नाटकातील कलावंत पनशीकर यांच्यानंतर आता परब यांना अभिनयाचे पारितोषिक दिले पाहिजे, अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी परब यांच्यावर टीका केली. (Kirit Somaiya: I have not seen Uddhav Thackeray criticized, liar and sly CM!)त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून कसे प्रत्युत्तर दिले जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.