Kasba Assembly By-Election: Whose Constituency? Who will spoil the 'math' of votes!

Kasba Assembly By-Election: मतदारसंघ कुणाचा? मतांचे ‘गणित’ कुणाचे बिघडणार !

पुणे।कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत (Banners asking this question) लागले आहेत. कसबा  मतदारसंघाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून भाजपमधील (BJP)अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले असले तरी याचा फटका भाजपला बसणार की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची कोंडी होणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र पेठांमध्ये आता ब्राम्हण समाजाची मतांची टक्केवारी किती ? ( What is the percentage of votes of the Brahmin community in Peth?) हा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. त्यात भाजपच्या सर्व्हेत (Survey of BJP)हा मुद्दाही प्रकर्षाने मांडण्यात आल्याची चर्चा असून त्यानुसार ब्राम्हणेत्तर उमेदवार देण्याची रणनीती भाजपची आहे ;पण मतदारसंघ कुणाचा हा मुद्दा तापविण्याच्या खेळीत मतांचे ‘गणित ‘कुणाचे बिघडणार हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. 

बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर केले. कसबा पेठ येथून अपेक्षेप्रमाणे हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले मात्र रासने  यांच्या नावाला हिंदू महासभेने विरोध केला आहे. आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले.त्यामुळे भाजपच्या गोटात आता ब्राम्हण विरुद्ध ओबीसी हा वाद  (Brahmins vs OBCs debate  )पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. शहराच्या राजकारणात यापूर्वी हा वाद सतत चर्चेत असायचा. इतकेच काय अंतर्गत गटबाजीत शहर कार्यालयावर दगडफेक करण्याच्या घटनाही विसरून चालणार नाही. 

राज्यात पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यात भाजपाला अपेक्षित यश आले  नसल्याचे  दिसून आले. यानंतर आता पुण्यातील कसबा आणि पिंपरी या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणूक होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्याविरोधात स्थानिक ब्राह्मण समाजात नाराजी असल्याचे  सांगितले  जात आहे. हिंदू  महासभेचे नेते आनंद दवे यांनी जाहीरपणे यासंदर्भात वक्तव्य करून याचा किती फटका बसेल, ते  लवकरच  कळेल, असा गर्भित इशाराच दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या यावर सूचक भाष्य करणारे बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहेत आणि त्या बॅनर्सची चर्चा कसबा विधानसभा मतदारसंघात रंगत आहे. परिणामी त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होणार  असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.  मात्र   महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांनाही जोर लावावा लागणार आहे.त्यात मतदानाची ‘फाटाफूट’ टाळण्यासाठी  ‘बेरजेचे समीकरण’ केल्याशिवाय गंत्यंतर नाही मात्र त्यात किती यश मिळते यावर धंगेकर यांच्या मतांचे गणित सुकर होणार असल्याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.

  शहरात लागलेले बॅनर्स नेमके कुणी लावले आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून या बॅनर्सवर लिहिणाऱ्याचे  नाव ‘कसब्यातील एक जागरूक मतदार’ असे नमूद करण्यात आले  आहे. मात्र, असे  असले  तरी हे बॅनर्स आणि त्यावर मांडण्यात आलेला मुद्दा यामुळे पुण्यात पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बॅनरवर पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड आणि आता कसबा या दोन मतदारसंघांमधील भाजपाच्या उमेदवारीचा उल्लेख केल्याचे  सूचित होत आहे. “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…टिळकांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापटांचा का???… समाज कुठवर सहन करणार?” असा प्रश्न या बॅनरवर उपस्थित करण्यात आला आहे.त्यामुळे या मतदारसंघात ब्राम्हण समाज तटस्थ भूमिकेत गेला तर मतदानाचा टक्का घसरणार हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. तसेच हिंदू महासंघाने उमेदवार रिंगणात उतरवला तरी त्याचा फटका हा भाजपला बसणार आहे. (Kasba Assembly By-Election: Whose Constituency? Who will spoil the ‘math’ of votes!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *