HK Patil, the in-charge secretary of the All India Congress Committee (AICC) in Maharashtra and former minister, has claimed that more than 19 lakh EVMs went missing between 2016 and 2018. On this, Karnataka Assembly Speaker Vishweshwar Hegde Kageri has assured that an impartial inquiry will be held into the matter and also said that Election Commission officials will be called.

Karnataka:तब्बल 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन गायब

बेंगळुरू। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC ) महाराष्ट्राचे प्रभारी सचिव आणि माजी मंत्री एच .के पाटील ( H.K.PATIL)  यांनी  2016 ते 2018 या काळात 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन (EVMs Machine missing )  गायब झाल्याचा दावा केला आहे.

 निवडणुक सुधारणांवर झालेल्या चर्चेत त्यांनी हा दावा केला आहे. यावर कर्नाटक
( Karnataka)  विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल असे आश्वासन  दिले आहे तसेच  निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावले  जाईल  असेही ते म्हणाले आहेत.
विधानसभेत निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान सर्व सदस्यांनी व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निवडणूक अनियमिततेवर आपली मते मांडली.मात्र  काँग्रेसचे एच .के पाटील यांनी निवडणूक सुधारणेवर चर्चेत  2016 ते 2018 या काळात 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन गायब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले, नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये 53 मंत्र्यांपैकी 22 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. यावर लोक काय विचार करतील? असा प्रश्नही  त्यांनी  उपस्थित केला आहे. तसेच ईव्हीएमबाबत अनेक शंका आहेत. मात्र, निवडणूक आयोगानेही शंका दूर करण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ईव्हीएम गहाळ होण्याचा आकडा धक्कादायक आहे.
  निवडणूक आयोगाला या आरोपांना उत्तर द्यावे लागेल. या गहाळ ईव्हीएमचा गैरवापर होण्याची शक्यता कशी नाकारू शकते? या ईव्हीएमचे काय झाले या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही, तर ईव्हीएम गैरव्यवहाराबाबतचा आमचा संशय अधिकच वाढेल, असेही पाटील म्हणाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *