Karnataka BJP: Due to the RSS survey report, BJP's 'waiting' is difficult!

Karnataka BJP:आरएसएसच्या सर्वेक्षण अहवालामुळे भाजपची ‘वाट’चाल बिकट ! 

नवी दिल्ली। कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीची (Karnataka BJP) अवस्था बिकट ठरणार आहे. आगामी सत्तासमीकरणांसाठी भाजपला (BJP) तारेवरची कसरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे ठाम मत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra)इथे मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. २० दिवस ही यात्रा या राज्यात होती. त्यात  फेब्रुवारीमध्ये आरएसएसने ( RSS submitted a survey report)  कर्नाटकमध्ये भाजपला सर्वेक्षण अहवाल सादर केला. यामध्ये त्यांना 70 ते 75 जागा जिंकणार असल्याचे सांगण्यात आले. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे.परिणामी एकहाती सत्ता हे स्वप्न हवेतच राहणार आहे. नेहमीप्रमाणे अन्य पक्षांच्या ‘ कुबड्या’ घेऊनच भाजपला वाटचाल करावी लागणार असली तरी सत्ता मिळवणे यंदा अवघड असल्याचे चित्र आहे. 

कर्नाटकमध्ये   20 जुलै 2019 पासून  भाजपची सत्ता आहे.मात्र  या 4 वर्षात त्यांना एकदा मुख्यमंत्री बदलावे लागले. बसवराज बोम्मई 28 जुलै 2021 पासून येथील मुख्यमंत्री आहेत. त्यात भाजपची अवस्था अशी झाली आहे की, पक्षाने मुख्यमंत्रीपदावरून हटवलेले आणि निवृत्तीची घोषणा करणारे बीएस येदियुरप्पा आता त्यांच्या भरवशावर निवडणूक प्रचार पुढे नेत आहेत. याचे कारण म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष नलिन कुमार कटील हे लोकांचा सरकारकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यात अयशस्वी ठरल्याचा सर्वेक्षण अहवाल आहे.त्यात भाजपच्या वर्तुळात अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढतच आहे.

राजकीय अभ्यासकांच्या विश्लेषणातही भाजपला ही  धोक्याची घंटा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  ज्येष्ठ पत्रकार बेलागारू समिउल्ला यांच्या मते,  भाजपच्या विरोधात जबरदस्त अँटी इन्कम्बन्सी आहे. भ्रष्टाचार हा इथे मोठा मुद्दा आहे.

3 मार्च रोजी भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या घरातून 8 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यांच्या मुलाला 40 लाखांची लाच घेताना लोकायुक्तांनी अटक केली. त्यामुळे पक्ष आणखी अडचणीत आला आहे. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा सातत्याने होत आहेत  ;पण  सत्ताविरोधी वातावरण बदलण्यात पक्ष सक्षम नाही.

काँग्रेसचा प्रचार आक्रमकतेने !

आता येदियुरप्पा आणि पीएम मोदी यांच्या जोडीद्वारे प्रचार केला जात आहे. येदियुरप्पा लिंगायत मते एकत्र करू शकतात,मात्र संपूर्ण राज्यात एकट्याने भाजपला विजय मिळवून देऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या सभांना लोक येत नाहीत. राज्यात काँग्रेसचा प्रचार अतिशय आक्रमक आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ते भाजपला घेरत आहेत.(Karnataka BJP: Due to the RSS survey report, BJP’s ‘waiting’ is difficult!)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *