Karnataka Assembly Election 2023: Polling in Karnataka on 10 May, Results on 13 May

Karnataka Assembly Election 2023:कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान, निकाल १३ मे रोजी 

नवी दिल्ली । कर्नाटक निवडणूकीचा बिगुल वाजला असून 10 मे रोजी विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election )होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होतील. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ( Chief Election Commissioner Rajiv Kuma) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. कर्नाटकात 5.21 कोटी मतदार असून  224 विधानसभा जागांवर मतदान करणार आहेत.त्यात  9.17 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.दरम्यान  यंदा भाजप (BJP) सत्ता राखते की, काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)करिष्मा दाखवतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, यापूर्वी एक प्रक्रिया सुरू केली होती. याअंतर्गत 1 एप्रिल रोजी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण होईल, त्यांनाही मतदान करता येणार आहे. दरम्यान, कर्नाटकात यंदाही मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात होणार आहे. मागच्या वेळी जेडीएस-काँग्रेस एकत्र होते. मात्र, यंदाच्या निवडणूकीत जेडीएस स्वतंत्र लढणार आहे.

कर्नाटकातील विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ 24 मे रोजी संपणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पा 17 मे 2018 रोजी मुख्यमंत्री झाले. 23 मे 2018 रोजी अवघ्या सहा दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले होते.

2018 ला  10,500 कोटी रुपये खर्च

कर्नाटकात 12 मे 2018 रोजी विधानसभेच्या 222 जागांवर मतदान झाले होते. ज्यामध्ये 5.06 कोटी मतदारांपैकी विक्रमी 72.13 टक्के मतदारांनी मतदान केले. सेंटर फॉर मीडिया स्टडीजने आपल्या सर्वेक्षणात ही निवडणूक सर्वात महागडी असल्याचे म्हटले आहे. कर्नाटक निवडणुकीत सुमारे 10,500 कोटी रुपये खर्च झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *