पुणे|
कोरोनामुळे मोठ्याप्रमाणावर बेरोजगार झालेल्या युवा वर्गाला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातर्फे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या नोकरी महोत्सवाचा शुभारंभ खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

याप्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी , श्रीकांत पाटील, इकबाल शेख, औदुंबर खुनेपाटील, शिवाजी पाटील, युवक अध्यक्ष महेश हांडे,राजू साने यांच्यासह संयोजक व माजी सभागृह नेते निलेश निकम, माजी नगरसेवक उदय महाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आशाताई साने, मंगला पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी या महोत्सवात नाव नोंदविलेल्या तरुण – तरुणींना विविध कंपन्यातील नोकरीसाठीचे नियुक्तपत्र वितरित करण्यात आले. कोरोनामुळे आधीच नोकरी गेलेल्यांसह जे बेरोजगार आहेत,अशांना हा नोकरी महोत्सव दिलासादायक ठरला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी तरुणांनी दिल्या.