Shirur Lok Sabha Constituency Dr. Amol Kolhe NCP Sharad Chandra Pawar Party

Jayant Patil: ‘शिरूर’ मधून डॉ. अमोल कोल्हे ‘लोकसभा’ लढणार! 

 मतदारांच्या घरात जावून पेट्रोल, गॅस महागला हे सांगा : कार्यकर्त्यांना आवाहन 


पुणे।आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बूथ कमिट्या सक्षम करा. बूथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपणच आपली फसवणूक करून घेतो, असा त्याचा अर्थ होतो. गर्दी जमणे, माणसे गोळा होणे, हे महत्वाचे असून निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचणारे सैन्य नसेल तर पक्षाच्या प्रचाराला तळागळापर्यंत पोहचविण्याची क्षमता कमी होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Constituency) डॉ. अमोल कोल्हे(Dr. Amol Kolhe)  उभे राहणार आहेत. शरद पवार यांच्याबद्दल समाजात प्रचंड सहानभूती आहे. त्याचा कोल्हे यांना फायदा होणार असल्याचे प्रतिपादन  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Chandra Pawar Party)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी करतानाच  लोकसभेचा पहिला उमेदवारही  जाहीर केला. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पाटील बोलत होते. शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे, प्रवक्ते माधव पाटील यावेळी उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले की,  काही लोक गेले असले तरी नाउमेद होऊ नका, मतदार जागेवरच आहे. शरद पवार यांच्याबद्दल समाजात प्रचंड सहानभूती आहे. पवार यांचे नाव, तपश्चर्या असून त्याचा निवडणुकीत फायदा होईल असा दावा करत त्यांनी  शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.परीक्षा जवळ आली असून संघटनेच्या कामाला गती द्यावी. नशीबाने जेवढे लोक मते देतील, असे राजकारण आम्ही कधी केले नाही. शरद पवार यांचे नाव, तपश्चर्या आहे, हे सगळे खरे असले तरी जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरात जावून पेट्रोल, गॅस महागला हे सांगावे. ४६४ बूथ गुणिले चार हजार ६४० माणसे झाली तर शरद पवार यांची भोसरी विधानसभेत जाहीर सभा घेण्यात येईल. गटबाजी, एकमेकांचा मत्सर वाढायला लागला आहे. गटबाजी संपविली पाहिजे. पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्याच्या पाठिशी रहावे, सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, असेही पाटील म्हणाले.

Jayant Patil: from ‘Shirur’. Dr. Amol Kolhe will contest ‘Lok Sabha’!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *