नवी दिल्ली|
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महिलांच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
महिला काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी राहुल गांधी यांनी आरएसएससह भाजपच्या विचारसणीवर टीकेची तोफ डागली.
राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान दिल्या,मात्र भाजप काय आरएसएसकडे समान वागणुकीसाठी जागा नाही. काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून इतर विचारसरणीशी तडजोड करू शकतो;पण भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी तडजोड करू शकत नाही असे स्पष्ट करताना महात्मा गांधी यांच्या काँग्रेस आणि गोडसे – सावरकरांच्या विचारसरणीत काय फरक आहे ? हा आमच्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.