If Utpal Parrikar is going to fight for independence then support! Panaji Shiv Sena and NCP have formed an alliance in Goa. Shiv Sena leader Sanjay Raut said in a press conference that if Utpal Parrikar, who was ousted from BJP, will fight independently, then we will support him. NCP leaders Praful Patel, Jitendra Awhad and Sanjay Raut held a press conference in Goa. This time, he announced his decision on the alliance. At that time MP Sanjay Raut reacted to Utpal Parrikar. He said that if Utpal Parrikar contests independent elections from Panaji constituency, Shiv Sena and NCP will support him. However, Raut said that it was an insult to Manohar Parrikar if the BJP refused to give him a ticket as the son of Manohar Parrikar.

उत्पल पर्रिकर   स्वतंत्र लढणार असतील तर पाठिंबा! 

पणजी| 
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली आहे.आगामी  गोवा विधानसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष सोबत लढवणार आहे. त्यात  भाजपकडून डावलले उत्पल पर्रिकर हे जर स्वतंत्र लढणार असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहेत अशी भूमिका  शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी या युती बद्दल निर्णय घेऊन तो जाहीर केला. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी  उत्पल पर्रिकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रिकरांनी अपक्ष निवडणूक लढविल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देणार आहे. मात्र भाजपने मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारल्यास हा मनोहर पर्रिकर यांचा अपमान असल्याचे राऊत यांनी सांगितले.
 राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही.  आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत घोषित करणार आहे. 
  
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत;पण … 
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे   काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, मात्र गोव्यात काँग्रेसने आडमुठेपणाची भूमिका घेतल्यामुळे आम्हाला त्यांच्या विरोधात लढावे लागत आहे, आमची लढाई ही लोकशाही पद्धतीने असणार आहे.  आम्ही गोव्यात, कोणता पक्ष आमच्या समोर आहे.  हे पाहणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मांडली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *