Rane visited Shivsmarak on the occasion of inauguration of BJP's Jan Ashirwad Yatra

‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’

मुंबई

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवस्मारकाला दिलेली भेट आणि त्यानंतर शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणावरून  शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केलेल्या  वक्तव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  कोण नारायण राणे हे मला माहीत नाही, असे म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांना ‘जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल’ असे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. 
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या शुभारंभप्रसंगी राणे यांनी शिवस्मारकाला भेट दिली.  त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे  शिवसैनिकांनी शुद्धीकरण केले. आता त्यात गोमूत्र कोणाला शिंपडायचे, त्यांना शिंपडू द्या. कोणाला प्यायचे त्याला पिऊ द्या.  त्यात माझा काय संबंध.  मला काय विचारता?त्यांना विचारा कि,  का शिंपडलं ?  असं काय दूषित झालं होतं? असा सवाल करताना स्मारकाचे शुद्धीकरण करण्यापेक्षा मन शुद्ध करा, असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *