'INDIA's meeting in Mumbai: Time for the third meeting of 'INDIA'!

‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai: ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीला अखेर मुहूर्त!

मुंबई।  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या( 2024 Lok Sabha election)पार्श्वभूमीवर  सत्ताधारी भाजप विरोधात एकत्र आलेल्या विरोधी पक्षाच्या आघाडीची  ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीला अखेर मुहूर्त मिळाला (‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai)आहे.मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी  ‘I.N.D.I.A.’  तिसरी बैठक पार पडणार आहे. याआधी बिहारमधील पाटणा त्यानंतर कर्नाटकमधील बंगळुरू येथे विरोधी पक्षाच्या आघाडीची बैठक झाली होती. आता महाराष्ट्रात मुंबईत होणाऱ्या  ‘i.n.d.i.a. alliance’ च्या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे ( ठाकरे गट ) आहे. 

 मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर  खासदार  संजय राऊत यांनी ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीबाबत ( ‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai)माहिती दिली. यावेळी खासदार राऊत म्हणाले,   मुंबईत मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली. पाटणा आणि बंगळुरूनंतर आता मुंबईत ‘इंडिया’ गटाची तिसरी बैठक पार पडणार आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईच्या ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. ३१ ऑगस्टला सायंकाळी ही बैठक सुरू होईल आणि १ सप्टेंबरलाही बैठक सुरूच राहील. १ तारखेला साडेदहा वाजता बैठकीला सुरुवात होईल आणि ३ वाजेपर्यंत ही बैठक संपेल. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल.  मुंबईच्या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे (ठाकरे गट) आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचे सहकारी आहेत. आम्ही एकत्र काम करणार आहोत. पण बैठकीचे  यजमानपद शिवसेनेकडे (ठाकरे गट) असेल, असे  आमचे  ठरले  आहे. प्रत्येकाकडे कोणत्या जबाबदाऱ्या असतील? याचे  वाटपही झाले आहे.  आजच्या बैठकीला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि अनिल देसाई उपस्थित होते 

NEWS TITLE|. ‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai |2024 Lok Sabha election|Time for the third meeting of ‘INDIA’!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *