I.N.D.I.A: विरोधी पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला जाणार

नवी दिल्ली ।  विरोधी पक्षांच्या 20 हून अधिक खासदारांचे (I.N.D.I.A) एक शिष्टमंडळ या आठवड्यात मणिपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकताच मणिपूरचा दौरा केला. त्यानंतर मोदींवर (Prime Minister Narendra Modi) त्यांनी निशाणा साधला आहे. (opposition MPs to go to Manipur)

विरोधी पक्षांची महाआघाडी I.N.D.I.A च्या खासदारांचे  हे पथक येत्या 29-30 जुलै रोजी मणिपुरला भेट देणार असून  ते पीडितांची भेटही  घेणार आहेत. (opposition MPs to go to Manipur) 

मणिपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी हिंसक घटना घडल्या. गुरुवारी सकाळपासून थोरबांग आणि कांगवे येथे गोळीबार सुरू आहे. दोन्ही ठिकाणी मेईतेई आणि कुकी समोरासमोर आहेत.

मणिपूरमध्ये बुधवारीही म्यानमार सीमेवर गोळीबार आणि जाळपोळ झाली. या परिसरात कुकी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मिझोरमची राजधानी ऐजॉलमध्ये कुकी समुदायाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यात मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनीही सहभाग घेतला. बिरेन सिंह म्हणाले की, जोरमथांगाने दुसऱ्या राज्याच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये.

सीएम सिंह म्हणाले, ‘राज्य सरकारचा ड्रग्ज कार्टेलविरुद्धचा हा लढा आहे. मणिपूर सरकार राज्यात राहणाऱ्या कुकी समाजाच्या विरोधात नाही. आयझॉल रॅलीमध्ये 50 हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. बिरेन सिंह म्हणाले, ‘मणिपूरमध्ये घडणाऱ्या सर्व घटनांवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. मणिपूरची अखंडता नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करू.

हिंसाचारामुळे मणिपूरमधील कुकी-जोमी समुदायाच्या सुमारे 13,000 लोकांनी पलायन करून शेजारच्या राज्यात आश्रय घेतला आहे. खरं तर, मिझोरामच्या मिझो जमातीचे कुकी-जो जमाती आणि म्यानमारच्या चीन समुदायाशी मजबूत संबंध आहेत. त्यामुळेच कुकी समाजाच्या समर्थनार्थ येथे रॅली काढण्यात आली.त्यात मणिपूर धगधगत असताना सत्ताधारी भाजपने मात्र मौनव्रत धारण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)या प्रश्नी एक अवाक्षर काढत नसून ७९ दिवसांनी मणिपूर प्रश्नावर केवळ ३६ सेकंद बोलले. मात्र विरोधी पक्षांवर टीका करण्याकडेच त्यांचा कल असल्याने विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खिंडीत गाठले आहे. त्यात आता विरोधी पक्षांची महाआघाडी I.N.D.I.A च्या खासदारांचे पथक  मणिपूरला भेट देणार आहेत. परिणामी आता सत्ताधारी भाजपाची अडचण वाढली आहे. I.N.D.I.A: Delegation of opposition MPs to go to Manipur

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *