बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर । कर्नाटकातील एका मतदारसंघाच्या यादीचे विश्लेषण करून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने संगनमताने मत चोरी केल्याचा आरोप केल्यानंतर शिर्डी (shirdi) विधानसभा मतदारसंघात देखील मतांची चोरी (matanchi-chori-shirdi ) झाल्याचा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.मात्र हा (matanchi-chori-shirdi ) आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी आरोप करताना म्हटले आहे कि, शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या
( matanchi-chori-shirdi) हजारोंनी वाढविण्यात आली. याबद्दल आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करून हा प्रकार वेळीच थांबवा, असे आवाहन केले होते. मात्र, कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा दावा थोरात यांनी केला आहे.
आता राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुराव्यानिशी आरोप केले आहेत आणि प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यावर निवडणूक आयोगाने उत्तरे देणे गरजेचे आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.
हा तर मतदारांचा अपमान
लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करून महाविकास आघाडीने लोकांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर मते मिळवली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आल्यामुळे जनतेने त्यांना नाकारून महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, असे प्रत्युत्तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. लोकसभेला तुम्हाला अनपेक्षित यश मिळते.
आंध्रा सारख्या काही राज्यांमध्ये तुमची सत्ता येते. त्यावेळी मतदानात आणि मतदार याद्यांमध्ये गोंधळ नसतो. तुमचा पराभव होतो, त्या ठिकाणी मात्र हा गोंधळ झालेला असतो. अशाप्रकारे निवडणूक आयोगावर आरोप करणे हा खुद्द मतदारांचा अपमान आहे, अशा शब्दात विखे पाटील यांनी थोरात यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.