नवी दिल्ली
संसदेच्या अधिवेशनाचा आज पंधरावा दिवस. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील चर्चा यावर एकमत होत नाही. विरोधकांना पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु करायची आहे तर सरकारला या मुद्द्यापासून फारकत घ्यायची ,असेच चित्र सध्या आहे.

दररोज दोन्ही सभागृहात विरोधक गोंधळ घालत आहेत. परिणामी दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागत आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने कोंडीतून मार्ग कसा काढायचा यावर सरकारची रणनिती सुरू आहे.
19 जुलै रोजी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशन सुरु झाल्यापासून पेगासस हेरगिरी, कोरोना आणि कृषी कायदा वरून दोन्ही सभागृहात विरोधक गदारोळ घालत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कायदे पारित होत आहेत. मात्र त्यावर चर्चा होत नसल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.