NCP supremo Sharad Pawar and state Home Minister Dilip Walse-Patil met at YB Center in Mumbai. The visit sparked a political debate. However, Home Minister Dilip Walse Patil, while talking to the media, clarified that various issues besides politics were discussed.

Home Minister Dilip Walse Patil:’विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी चालवता’

मुंबई ।  आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप करून महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकणाऱ्या  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Opposition leader Devendra Fadnavis)  यांनाच गृहमंत्र्यांनी ‘ लक्ष्य’ केले. ‘विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी चालवता’ अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil) यांनी फडणवीस यांना टोला लगावला. कायदा सुव्यवस्थावरील चर्चेला उत्तर देताना  आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप झालेले वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. तसेच हे प्रकरण आता तपासासाठी सीआयडीकडे ( CID for investigation)  देण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.  
 जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले. यावेळी वळसे पाटील यांनी   फडणवीसांना याआधीचे पेन ड्राईव्हचे दाखले दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपण पाच हजार विहिरीचे पेन ड्राईव्ह दिले होते. मागील आठवड्यात आपण  अध्यक्ष यांना एक पेन ड्राईव्ह दिला, आजही आपण वक्फ बोर्डावर लांबे याची नियुक्ती कशी केली याचा एक पेन ड्राईव्ह दिला, विरोधी पक्षनेते आहात की तुम्ही डिटेक्टिव्ह  एजन्सी  चालवता, असा टोला गृहमंत्री वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत लगावला आहे.

 फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू असलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान, फडणवीस यांनी आज सभागृहात सादर केलेल्या पेन ड्राइव्ह संदर्भात बोलताना डॉ. तांबे यांची नियुक्ती सरकारने केलेली नाही तर निवडून आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *